Eknath Shinde Sarkarnama
विदर्भ

Eknath Shinde : भंडाऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेपेक्षा अनुपस्थित नेत्यांचीच अधिक चर्चा

Political discussion of absence of BJP leaders from CM Eknath Shinde meeting at Bhandara : शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भंडारा इथं झालेल्या सभेला महायुतीमधील भाजपच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. तिकीट वाटप झाले. प्रचारालाही उमेदवार लागले आहे. असे असतानाही काही उमेदवारांबाबत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अद्यापही एकमत झाले असल्याचे दिसून येत.

गुरुवारी भंडाराचे शिवसेनेच्या उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यासभेला भंडारा जिल्ह्यातील भाजप आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी हजेरी लावली नाही. सभा जोरदार झाली, मात्र सर्वांना युतीचे नेते का आले नाही? याचीच जास्त चर्चा पवनी येथे होती.

भंडारा विधानसभा मतदार संघातून नरेंद्र भोंडेकर अपक्ष निवडून आले होते. नंतर ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत सहभागी झाले. शिवसेनेने त्यांच्यासाठी भंडारा मतदारसंघ मागून घेतला आणि भोंडेकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. जागा वाटपावरून आमच्याच कुठलाही वाद नाही, मतभेद नाहीत, असेच महायुतीचे नेते शेवटपर्यंत सांगत होते. मात्र एकमेकांच्या उमेदवारांविषयी असलेली नाराजी आता समोर येऊ लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेची निवडणूक लढत असल्याचे भाजपचे (BJP) नेते वारंवार सांगत आहेत. असे असताना भंडारा मतदारसंघातील पवनी येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला भाजपच्या नेत्यांनी पाठ दाखवली. भाजपने भंडारा जिल्ह्याचे नेतृत्व आमदार परिणय फुके यांच्याकडे सोपवले आहे. किमान ते उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती.

राष्ट्रवादी नेत्यांची पाठ

दुसरीकडे भंडारा-गोंदियया जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल हे सुद्धा सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे भोंडेकर हे महायुतीच्या पसंतीचे उमेदवार नाही का? अशी विचारणा केली जात आहे. तसा संदेशही मुख्यमंत्र्यांच्या सभेला अनुपस्थित राहून नेत्यांनी दिला असल्याचा तर्क व्यक्त केला जात आहे.

भाजपमध्ये जाणार अशी चर्चा

नरेंद्र भोंडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी भोंडेकर हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र भोंडेकर यांनी आमदार परिणय फुके यांच्यामुळे आपण भाजपत गेलो नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. कदाचित हासुद्धा राग भाजपचा त्यांच्यावर असू शकतो.

भोंडेकर मूळचे शिवसैनिक

भोंडेकर मूळचे शिवसैनिक आहेत. ते यापूर्वी निवडून आले होते. युती आणि आघाडी तुटल्यानंतर ते पराभूत झाले होते. 2019च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी तिकीट नाकारले होते. ते अपक्ष लढले आणि निवडूणसुद्धा आले. त्यामुळे भोंडेकर यांचा भाव सध्या चांगलाच वधारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT