Eknath Shinde : मुख्यमंत्री रामटेकमध्ये आले पण दक्षिण नागपूरकडे फिरवली पाठ? काय आहे कारण?

CM Eknath Shinde in Vidarbha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी विदर्भातील भंडारा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली. पण मुख्यमंत्र्यांनी दक्षिण नागपूरमध्ये मुद्दामच सभा घेणे टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी विदर्भातील भंडारा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये सभा घेतली. शेवटची सभा दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती.

भाजपने सभेची जय्यत तयारी केली होती. लोकांची गर्दीसुद्धा मजली होती. मात्र शेवटपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेच नाही. उशिर झाल्याचे कळवून त्यांनी मोबाईलवरून संवाद साधला. असे असले तरी मुख्यमंत्र्यांनी दक्षिण नागपूरमध्ये मुद्दामच सभा घेणे टाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपने दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात आमदार मोहन मते यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसने गिरीश पांडव यांना उभे केले. दोघांमध्ये मागच्या निवडणुकीतही अटीतटीचा समाना रंगला होता. पांडव अवघ्या चार हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे पुन्हा या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : महाविकास आघाडीचा जाहीरनामा कॉपीपेस्ट, मुख्यमंत्र्यांनी डागली तोफ

भंडारामध्ये शिवसेनेने आमदार नरेंद्र भोंडेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पवनी येथे सभा घेतली. तेथून मुख्यमंत्री रामटेक विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार आशिष जयस्वाल यांच्यासाठी देवलापारला आले. येथील सभा आटोपून ते दक्षिण नागपूला येणार होते. पावणे दहा वाजेपर्यंत भाजपने त्यांची वाट पाहिली. मुख्यमंत्र्यांची सभा असल्याने कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनीसुद्धा गर्दी केली होती. आचारसंहितेनुसार रात्री १० वाजल्यानंतर सभा घेता येत नाही.

Eknath Shinde
Sanjay Raut : "कमजोर हृदयाची माणसं पळून गेली"; भुजबळांचा दावा अन् राऊतांचा हल्लाबोल

उशिर होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे नागरिकांसोबत संवाद साधला. मोहन मते यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर सभास्थळाच्या शेजारीच असलेल्य अक्षय भवन येथे अवघ्या दहा मिनिटात मुख्यमंत्री पोहचले. येथे शिवसैनिकांची त्यांनी बैठक घेतली आणि ते निघून गेले. महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश पांडव हे किरण पांडव यांचे संख्ये बंधु आहेत. किरण पांडव हे शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संघटक आहेत. त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे चांगलेच सख्य आहे. कदाचित याच कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची जोरदार चर्चा सध्या दक्षिण नागपूरमध्ये सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com