BJP Vs Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Parinay Phuke: पटोले पराभूत होणार, भाजपच्या 'या' नेत्याने सांगितला आकडा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीनिमित्ताने नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून कोण किती मतांनी पडणार याचे दावे केले जात आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : राज्यात सध्या विधानसभच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. एकमेकांना टार्गेट केले जात आहे. उणीदुणी काढली जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस पराभूत होणार असल्याचे सांगून टाकले. त्यास प्रत्त्युतर देताना भाजपचे आमदार परिणय फुके यांनी पटोले तब्बल 25 हजार मतांना पराभूत होणार असल्याचे सांगितले.

नाना पटोले मोठमोठे दावे करीत असतात. लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी पराभूत होणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले होते. मात्र गडकरी सुमारे एक लाखांच्यावर मते घेऊन विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेसुद्धा मागील निवडणुकीत 50 हजार मतांनी निवडून आले होते. यावेळीसुद्धा ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहे.

नाना पटोले (Nana Patole) यांची परिस्थिती वाईट आहे. मागील निवडणुकीत ते फक्त पाच हजार मतांनी जिंकले होते. आपणच त्यांच्या विरोधात उमेदवार होतो. ते थोडक्यात बचावले. यावेळी ते निश्चित पडणार असल्याचा दावाही फुके यांनी केला. फुके यांच्या या दाव्यामुळे नागपूर काँग्रेस पलटवार करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस नेमकं काय उत्तर देते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

नाना पटोले निवडून येतील की नाही याची चिंता काँग्रेसला लागली आहे. त्यांच्याकडे दुसरा काही विषय नाही. आरोप करून ते चर्चेत राहतात. प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. कोण किती मतांनी निवडणूक येणार हे लवकरच दिसणार आहे. एकदा त्यांनी निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी तपासून घ्यावी नंतर आरोप करावेत असेही फुके यांनी सुनावले.

मनोज जरांगे यांची मागणी असंविधानिक आहे. आता ते कोणाल पाडायचे आणि निवडून आणायचे या संदेश दिला असल्याचे सांगत आहे. ते ज्यांना जिंकून आणणार आहे ते त्यांची मागणी पूर्ण करणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे आहे हे एकदा स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT