Ajit Pawar Shard Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar NCP : शरद पवार अन् अजित पवारांचे कार्यकर्ते भिडले; 150 जणांवर गुन्हे दाखल

Tumsar Assembly Constituency : भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातील मोहाडी इथं शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक नेमके कोणत्या कारणावरून एकमेकांशी भिडले.

Pradeep Pendhare

Bhandara News : विधानसभा निवडणुकीत मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार कोणत्याही टोकाला पोचत आहे. वेगवेगळी अमिष दाखवण्याचे प्रकार समोर येत आहेत. यातून उमेदवारांचे समर्थकांमध्ये राडा होण्याचे प्रकार जवळपास राज्यातीने अनेक भागात घडलेत.

असाच प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघात झाला. इथं शरद पवार आणि अजित पवार यांचे कार्यकर्ते भिडले. याप्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत.

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान (Voter) होत आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. मतदारांना दाखवलेले अमिष हाणून पाडण्याचे देखील प्रकार होत आहे. यातून उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकमेकांना भिडण्याचे प्रकार होत आहेत. असाच प्रकार भंडार जिल्ह्यातील तुमसर इथं घडला.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार राजू कारेमोरे यांच्या समर्थकाच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने मिठाईसह इतर साहित्याचे वाटप केले. यात मिठाई, टिफिन बाॅक्स आणि इतर साहित्याचा समावेश होता. हा प्रकार शरद पवार यांच्या समर्थकांना कळला आणि यातून दोन्ही गटांत राडा झाला. शरद पवार यांच्या समर्थकांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत मतदारांना अमिष दाखवल्याचे म्हटले.

निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत मिठाईचे बाॅक्स आणि इतर साहित्य जप्त केले. शरद पवार यांच्या समर्थकांनी केलेल्या तक्रारीमुळे अजित पवार समर्थक चांगलेच आक्रमक झाले. तुमसर विधानसभा मतदारसंघातील मांडेसर या गावात दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांना भिडले. यानंतर मोहाडी पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रारी दाखल झाल्या. या मुळे तणावाचे वातावरण होते.

शरद पवार यांचे उमेदवार चरण वाघमारे यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसह मोहाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिथं दोन्ही बाजूने चांगलीच घोषणाबाजी झाली. पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मारला. पोलिसांवर दोन्ही बाजूने दबाव होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरीक्त पोलिस मोहाडी ठाण्यात पाठवले. हे सर्व नाट्य सोमवारी (ता. 11) दुपारपासून सुरू झालेले हे नाट्य ते रात्री उशिरा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर थांबलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT