Sunil Kedar: केदारांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला; उद्धव सेनेचे सैनिक संतापले

Sunil Kedar Betrayed Uddhav Thackeray: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी बंडखोराला साथ देणाऱ्या सुनील केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. केदारांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही बरबटे यांनी केला.
Uddhav Thackeray , Sunil Kedar
Uddhav Thackeray , Sunil Kedar sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोरीने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. काँग्रेसचे नेतेही बंडखोराच्या प्रचाराला उघडपणे जात असल्याचे आघाडीच आणखीच दुफळी माजली आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार विशाल बरबटे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना आवरण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी बंडखोराला साथ देणाऱ्या सुनील केदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. केदारांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोपही बरबटे यांनी केला.

रामटेक लोकसभा मतदारसंघ मोठ्या विश्वासाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेससाठी सोडला होता. त्या बदल्यात आम्ही एकच विधानसभा मतदार मागितला. तेसुद्धा सुनील केदार यांना खटकले. किमान उद्धव ठाकरे यांचा ते मान ठेवतील, केदारांना उमेदवारी मागे घ्यायला सांगितल, असे आम्हाला वाटत होते. मात्र, केदारांनी मुळकांना रिंगणात कायम ठेवले. आता ते त्यांच्या प्रचारातही जात आहेत. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत.

Uddhav Thackeray , Sunil Kedar
Uddhav Thackeray : दुसऱ्यांदा बॅग तपासणी, आता मोदींची बॅग महाराष्ट्रातून जाताना तपासा; ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

आम्ही आमच्या वरिष्ठांकडे याची तक्रार केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांनी यांनी आपल्या नेत्याला व कार्यकर्त्यांना तंबी देण्याची गरज आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याची खंतही बरबटे यांनी व्यक्त केली. आमचा सरसकट सर्वच काँग्रेस नेत्यांवर आरोप नाही. रामटेक वगळता सर्वच मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळला जात आहे.

Uddhav Thackeray , Sunil Kedar
Nitin Gadkari : टीव्ही फोडण्याची धमकी दिली म्हणून बापाने दिले मुलाला तिकीट; नितीन गडकरी यांची टोलेबाजी

राजेंद्र मुळक हे केदारांना एवढेच प्रिय आहे तर त्यांनी त्यांच्या कोट्यात असेलल्या मतदारसंघातून उमेदवारी द्यायला पाहिजे होती. केदारांनी आधी आपल्या जागा घेतल्या. त्यानंतर उद्धव सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) जागाही हिसकावण्याच प्रयत्न केला. केदारांनी उद्धव सेनेला संपण्याचे षडयंत्र रचला असल्याचा आरोपही बरबटे यांनी केला.एकीकडे भाजपच्या विरोधात आपला लढा असल्याचे ते दाखवतात आणि दुसरीकडे बंडखोराला मदत करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न केदार व तसेच रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे करीत आहेत.

Uddhav Thackeray , Sunil Kedar
Sharad Pawar : शाळेतील विद्यार्थिनीसुद्धा सुरक्षित नाहीत; शरद पवारांची महायुती सरकारवर टीका

लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी होऊ नये, मतांचे विभाजन होऊ नये याकरिता उद्धव सेनेने आपपल्या उमेदवारालाल माघार घ्यायला लावली होती. केदार व बर्वे यांचे काम सोपे केले. मात्र, तेच आता उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करायला निघाले असल्याचे बरबटे यांनी सांगितले. यावेळी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम कापसे, संघटक सागर डबरासे, सुरेश साखरे, नागपूर जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया, युवासेनेचे नेते हर्षल काकडे, राध्येशाम हटवार आदी उपस्थित होते.

Uddhav Thackeray , Sunil Kedar
Uddhav Thackeray Video : मोठी बातमी! हेलिपॅडवर बॅगांची तपासणी, उद्धव ठाकरेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची झाडाझडती

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com