Chandrashekhar bawankule criticize nana Patole Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : 'मुख्यमंत्रिपद म्हणजे पटोलेंचे मुंगेरीलालचे स्वप्न', चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar bawankule criticize Nana Patole : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार हवे आहे. आघाडीचे सरकार कधीही येणार नाही. राहूल गांधी संविधानाबाबातही ते खोटे बोलले.

Rajesh Charpe

Chandrashekhar Bawankule News : लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीला आता राज्यात सत्ता येणार असल्याचा विश्वास वाटतो आहे. त्यामुळेच आघाडीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी आत्तापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचे सांगून टाकले आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हरियाणा राज्यातील निकालाचा दाखला देऊन 'पटोले यांनी मुंगेरीलाल के हसीन सप्ने बघू नये. वास्तवाचे भान ठेवावे', असा टोला लगावला.

बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार हवे आहे. आघाडीचे सरकार कधीही येणार नाही. राहूल गांधी यांनी आमचे खासदार निवडून द्या, खटाखट निधी घ्या असे म्हणाले होते. संविधानाबाबातही ते खोटे बोलले. त्यांना लोकसभेतही मतदारांनी नाकारले आता हरिणायतही तेच घडले.

ठाकरेंवर देखील बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला. भाजप इतका मानसन्मान काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते देत नाहीत. देवेंद्र फडणवीस हे मोठा भाऊ समजून त्यांचे सर्व कामे करीत होते. आता त्यांचे हाल सुरू आहे. शरद पवारांनी यांच्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. ते उद्धव ठाकरे यांना घरी बोलवतात. काँग्रेसवाले दिल्लीला बोलावतात, असा टोला ठाकरेंनी लगावला.

एकेकाळी सर्वच पक्षाचे नेते मातोश्रीवर हजेरी लावत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घराण्याची माती केली. महाविकास आघाडीचे नेते कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार नाही. 2019 मध्ये त्यांना महायुती फोडायची होती म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. आता त्यांची उपयोगिता संपली असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत रोज सकाळी खोटे बोलतात, हे आता सर्वांनाच कळले आहे.मध्यप्रदेशात लाडकी बहीण योजना बंद पडली असेही तो बोलले होते. मात्र मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक कोटी 30 लाख महिलांला लाभ दिला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. उलट जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आले तेथे त्यांनी योजना बंद केली आहे. खोटे बोलणाऱ्या संजय राऊत यांच्या विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल केला असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT