Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama

Aaditya Thackeray : महत्वाची सूचना – युवासेनेची सर्व पदं फक्त आणि फक्त..! ठाकरेंवर कुणी आणली ही वेळ?

Shiv Sena UBT Yuva Sena Maharashtra Politics : आदित्य ठाकरे हे युवासेनेचे प्रमुख असून त्यांच्या परस्पर नियुक्त्या केल्या जात असल्याचे समोर आले आहे.
Published on

Mumbai News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. अजूनही उध्दव ठाकरे यांची शिवसेना सोडून पदाधिकारी शिंदेकडे जात आहेत. त्याला युवासेनाही अपवाद नाही. पण आता युवासेनेतील वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

आदित्य ठाकरे प्रमुख असलेल्या युवासेने परस्पर नियुक्ती झाल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात राज्यातील एक-दोन तालुक्यांमध्ये या नियुक्त्या झाल्या आहेत. त्याची माहिती आता समोर असून खुद्द आदित्य ठाकरे यांनी त्याची दखल घेतली आहे.

Aaditya Thackeray
Shivsena UBT : नागपुरात ठाकरे सेनेच्या वाट्याला दोन जागा; उमेदवारही लागले कामाला

परस्पर होत असलेल्या नियुक्त्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. महत्वाची सूचना असे म्हणत त्यांनी युवासेनेची सर्व पदं फक्त आणि फक्त शिवसेना भवन इथूनच जाहीर होतात, असे ठणकावून सांगितले आहे.

मागच्या आठवड्यात 1-2 तालुक्यांमधे स्थानिक पातळीवर युवासेनेची पदं कोणीतरी परस्पर जाहीर केली आहेत. ही अफवा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, परस्पर नियुक्त्या झाल्याने युवासेनेतील समन्वयाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. युवासेनेवर नेमके कुणाचे नियंत्रण आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Aaditya Thackeray
Prashant Paricharak : भालके राहिले बाजूला परिचारकांसाठी शरद पवारांच्या ‘NCP’कडून चाचपणी?

नेमक्या कोणत्या तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या, याबाबत आदित्य ठाकरेंनी खुलासा केलेला नाही. तसेच या नियुक्त्या कुणी केल्या, त्यांच्यावर कारवाई झाली का, कारवाई झाली असेल तर काय कारवाई केली, याबाबतही आदित्य यांनी काहीची माहिती दिलेली नाही. त्यामुळे याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com