Sachin Pilot Sarkarnama
विदर्भ

Sachin Pilot : 'पढेंगे तो बढेंगे' सचिन पायलट यांचे भाजपला प्रत्युत्तर

Sachin Pilot campaigns in Nagpur for Congress in assembly elections: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नागपूर इथं काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेले खासदार सचिन पायलट यांनी 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेला जोरदार उत्तर दिलं.

Rajesh Charpe

Nagpur News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ‘बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा सध्या राज्याच्या राजकारणाच चांगलीच गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यापुढे जाऊन ‘एक है तो सेफ है', असा नारा दिला आहे.

यास काँग्रेसचे नेते आणि खासदार सचिन पायलट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘पढेंगे तो बढेंगे', हे काँग्रेसचे धोरण असून आम्ही ते आधीपासूनच राबवत असल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले.

विदर्भातील महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांच्या प्रचारासाठी पायलट आज नागपूला आले होते. यावेळी त्यांनी 'बटेंगे तो कटेंग' ही घोषणा मतदारांना अप्रत्यक्षपणे धमकावणारी आणि भीता दाखवणारी असल्याचा आरोप केला. भाजप नेहमीच दिशाभूल करते, जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत असते. निवडणूक आली की अशाच जातीय व धार्मिक मुद्यांवर जोर दिला जातो. दहा वर्षांत काय विकास कामे केली हे ते सांगत नाहीत, असा हल्ला सचिन पायलट यांनी चढवला.

भाजपच्या (BJP) दहा वर्षांच्या कार्यकाळात गरीब आणि श्रीमंतांच्या दरीत प्रचंड वाढ झाली आहे. ते फक्त श्रीमंत आणि उद्योगपतीसाठीच काम करतात आणि योजना राबवताता. फक्त निवडणुकीत कल्याणकारी घोषणा करतात. महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. लोकसभेत मोठा फटका बसल्या नंतर त्यांनी लाडकी बहीण योजना आणली असल्याचे खासदार पायलट यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगत आहे. मात्र सत्तेत असतान या सर्व गोष्टी का केल्या नाहीत, याचे उत्तर भाजपचे नेते देत नाही. हेच उत्तर आता शेतकऱ्यांना या निवडणुकीत घ्यायचे आहे. यासाठी मतदान टाळू नका, मतदान करा, एका मतदानातून मोठे परिवर्तन घडू शकते, असेही पायलट यांनी केले.

'रेवडी' म्हणणे अयोग्य

महाविकास आघाडीचे उमेदवार चांगले आहेत. त्यांचे वर्तनही चांगले आहे. काँग्रेसचे घोषणापत्र काही चांगल्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या आम्ही सत्ता आल्यानंतर निश्चितपणे पूर्ण करणार आहोत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये घोषणापत्रानुसार सर्व योजना राबवण्यात येत आहे. कल्याणकारी राज्याची आमची संकल्पना आहे. त्यामुळे गोरगरीबांना काही लाभ द्यावे लागतातच. त्यामुळे या योजनांना 'रेवडी' म्हणणे अयोग्य असल्याचे पायलट यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT