Rajkumar Badole Sarkarnama
विदर्भ

Mahayuti News: माजी मंत्री बडोलेंचा काल पक्षप्रवेश, आज राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर

Former Minister Rajkumar Badole Join Ajit Pawar NCP: महायुतीमध्ये जागांचा अदलाबदली होत असल्याने गोंदिया जिल्ह्यातील राजकीय गणितं बदलली आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी प्रवेश केला आणि बुधवारी पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव झळकले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर लढणार आहेत. यापूर्वी बडोले दोन वेळा भाजपचे आमदार होते. 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी त्यांचा अवघ्या 718 मतांनी पराभव केला होता. महायुतीमध्ये ही जागा आता राष्ट्रवादीकडे आली आहे.

चंद्रिकापुरे यांनी निवडणूक लढण्यास नकार देऊन मुलाला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र पक्षाने ती नाकारली. बडोले यांना प्रवेश देऊन त्यांना उमेदवार करण्यात आले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची अदलाबदली केली आहे.

अर्जुनी मोरगावच्या बदल्यात साकोली येथे कमळावर राष्ट्रवादीचा (NCP) उमेदवार लढणार आहे. यास स्थानिकांचा विरोध आहे. असे असले तरी बडोले यांची उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपलाही त्यांचा उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.

सुनिल मेंढे येथे खासदार होते. पटोले यांनी प्रदीप पडोळे यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडूनही आणले आहे. हा पराभव भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

आता पटोले यांच्या विरोधात जातीय समीकरण साधून महायुतीने अभिनाश ब्राम्हणकर यांचे नाव पुढे केले आहे. ते सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अदला-बदलीच्या राजकारमामुळे साकोली आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपने साकोलीत परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. स्थानिकांना डावलल्या जात असल्याने भाजपात नाराजी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT