Mumbai News : अजित पवारांची साथ देत 40 ते 42 आमदार सव्वा वर्षापूर्वी महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते.पण लोकसभेतील महाविकास आघाडी त्यातही शरद पवारांच्या जादुई करिष्म्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नवीन चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतरही जोरदार मुसंडी मारली होती.
त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी आपला मोर्चा शरद पवारांच्या 'तुतारी'कडे वळवला आहे असतानाच विदर्भातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक नेत्यांनी 'घड्याळा'ची साथ सोडत 'तुतारी' हाती घेत होते. तेव्हा अजित पवारांनी पुढील काही दिवसांत इतर पक्षातील मोठे नेते आमच्याकडे येणार असल्याचं सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतही इनकमिंगला वेग आला आहे.
विदर्भात मोठं वजन असलेल्या भाजप नेते राजकुमार बडोले (Rajkumar Badole) यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी केव्हाही येऊ शकते. तसेच अजित पवारांनी आपल्या इच्छुक उमेदवारांना एकीकडे ए बी फॉर्मचंही वाटप सुरू केलं आहे.
याचवेळी त्यांनी महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपचाच बडा नेता गळाला लावला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मंगळवारी(ता.22) प्रवेश केला आहे.
राजकुमार बडोले अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहेत. त्यांचा गोंदिया भागात मोठा दबदबा आहे. 2009 ते 2014 पर्यंत भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले. 2014च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.