MLA Raju Parwe Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Nagpur : 'या' आमदाराची अवस्था ‘घर का न घाट का'

Umarkhed Assembly Constituency: नागपूरच्या उमरेडचे आमदार राजू पारवे यांना महायुतीमधील शिवसेना आणि भाजपकडून संधी मिळाली नसल्याने नाराज आहेत.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूरमधील उमरेडचे आमदार असताना राजू पारवे यांना खासदार होण्याचे वेध लागले होते. काँग्रेससोडून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

पराभूत झाल्यानंतर महायुतीमधील कुठल्याच पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली नाही. त्यामुळे माजी आमदार पारवे यांची अवस्था ‘घर का ना घाट का‘ अशी झाली आहे.

काँग्रेसच्या (Congress) राजू पारवे यांनी 2019च्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांना पराभूत केले होते. चार वर्ष त्यांचा काँग्रेससोबत सुखाचा संसार सुरू आहे. लोकसभेची निवडणूक जवळ येताच त्यांची खासदार होण्याची इच्छा बळावली. भाजपने त्यांना रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र मुख्ममंत्री शिंदे यांनी यास ठाम नकार दिला. शेवटी राजू पारवे यांना लोकसभेचे उमेदवार करावे, अशी अट भाजपने घातली. त्यानुसार पारवे शिंदे शिवसेनेत दाखल झाले. महायुतीचे ते उमेदवार होते. भाजपचे नेते आणि स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभेत त्यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र नवख्या श्यामकुमार बर्वे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली.

पारवे यांना आपल्याच उमरेड विधानसभा मतदारंसघात मताधिक्यसुद्धा घेता आले नाही. पारवे शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाल्याने उमरेड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. विधानसभेची तिकीट देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र भाजपने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीच लोकसभेसाठी पारवे यांचे ऑपरेशन केले होते. ते तरी विचार करतील, अशी आशा पारवे यांना होती.

अगदी शेवटच्या दिवसापर्यंत भाजपने आपला येथे उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे राजू पारवे यांचा आशा वाढल्या होत्या. मात्र आज अकरा वाजता भाजपने उमरेडचा उमेदवार जाहीर करताच राजू पारेव यांना धक्का बसला. भाजपने माजी आमदार सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT