Nitin Raut vs BSP : ...म्हणून बहुजन समाज पार्टीमुळे वाढलं नितीन राऊतांचं टेन्शन?

North Nagpur Assembly Constituency : ..याची गोळाबेरीज भाजप कशी करते यावरच उत्तर नागपूरचा निकाल अवलंबून राहणार आहे.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhansabha Election: लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य दिले होते. महाविकास आघाडीमुळे माजी मंत्री तसेच काँग्रेसचे उमेदवार यांना काही धोका नाही, असे मानल्या जात आहे. मात्र आता बहुजन समाज पार्टीने उमेदवार बदलल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे.

बसपाने बुद्धम राऊत यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता त्यांच्याऐवजी माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांना 'हत्ती'वर बसवण्यात आले आहे. २०१४च्या विधानसभेच्या निवडणुकीत बसपाचे तत्कालीन उमेदवार किशोर गजभिये यांच्यामुळे पराभवचा धक्का बसला होता. या निवडणुकीत भाजपचे मिलिंद माने निवडून आले होते. गजभिये दुसऱ्या तर नितीन राऊत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. त्यानंतरच्या निवडणुकीतून राऊत यांनी उत्तर नागपूरमध्ये पुन्हा कमबॅक केले.

२०१४च्या निवडणुकीत माने यांनी ६९ हजार, गजभिये यांनी ५५ हजार तर नितीन राऊत यांनी ५० हजार मते घेतली होती. २०१९च्या निवडणुकीत बसपाचे मताधिक्य निम्म्यावर आले. सुरेश साखरे यांनी २३ हजार मते घेतल्याने राऊत पुन्हा विजयी झाले होते. हे बघता बसपाच्या उमेदवारावर येथे भाजपच्या (BJP) विजयाचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसून येते.

Nitin Raut
Ashish Deshmukh News : ...त्यामुळे आशिष देशमुखांची अवस्था म्हणजे, ‘जाना था जापान पहुँच गये चीन'

बसपाचे(BSP) उमेदवार मनोज सांगोळे महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. नगरसेवक म्हणून लोकप्रिय होते. टंचाईच्या काळात टँकरवर बसून ते पाणी वाटप करीत होते.

Nitin Raut
Nagpur BJP : ...अन् दक्षिणचा आमदार पाठवला पश्चिममध्ये! नागपुरात भाजप श्रेष्ठींचा कार्यकर्त्यांनाच धक्का

नितीन राऊत(Nitin Raut) विरोधातील काँग्रेसची मते ते स्वतःकडे खेचून आणू शकतात. बसापचे कॅडर व्होट उत्तर नागपूरमध्ये भरपूर आहेत. बसपाचा ग्राफ सातत्याने खालावत असला तरी विधानसभेच्या निवडणुकीत मनोज सांगोळे तो वाढवू शकतात. असा बसपाला विश्वास आहे. मुस्लिमांना नागपूरमध्ये एकही जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे हा समाज काँग्रेसवर नाराज आहे. उत्तर नागपूरमध्ये मुस्लिम मतदारांची सख्याही निर्णायक आहे. याची गोळाबेरीज भाजप कशी करते यावरच उत्तर नागपूरचा निकाल अवलंबून राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com