Bagpur ZP, BJP, Congress Sarkarnama
विदर्भ

Nagpur ZP News : भाजपनं विधानसभेचं मैदान मारलं, आता तयारी ZP ची; केदार, देशमुखांचं वर्चस्व संपुष्टात?

BJP Politics Congress Sunil Kedar Anil Deshmukh : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या हाती गेली होती. 59 पैकी काँग्रेसचे 32, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले होते.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून महायुतीने राज्यात पुनरागमन केले आहे. आता भाजपला नागपूर जिल्हा परिषदेत परतीचे वेध लागले आहेत. राज्यात आलेली सत्ता आणि जिल्ह्याचे नेते सुनील केदार विधानसभेत पराभूत झाले असल्याने भाजपसमोरची मोठी अडचण दूर झाली असल्याचे दिसून येते.

नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपुष्टात येत आहे. नव्याने निवडणूक जाहीर होण्यास सुमारे तीन ते चार महिन्यांचा कार्यकाळ जाणार आहे. या दरम्यान महापालिकेप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेवरही प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसच्या हाती गेली होती. 59 पैकी काँग्रेसचे 32, राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले होते.

भाजपला फक्त 14 जागांवर समाधान मानावे लागले होते. शिवसेना एक, अपक्ष एक, गोंडवाना गणतंत्र पार्टी एक, शेकापचा एक सदस्य निवडून आला होता. त्यामुळे भाजपला जिल्हा परिषदेवरच झेंडा उतरवा लागला होता. आता मात्र सर्वच सूत्र भाजपच्या हाती राहणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आणि शिवसेनेचे आशिष जयस्वाल राज्यमंत्री आहेत.

भाजपचे बळ वाढले आहे. याशिवाय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे आता वर्चस्व राहिले नाही. दुसरीकडे काँग्रेसला जिल्हा परिषद एकहाती जिंकून देणारे सुनील केदार विधानसभेच्या निवडणुकीत पत्नीला सावनेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणू शकले नाहीत. त्यांच्या मतदारसंघात भाजपच्या आशिष देशमुखांनी तब्बल 30 वर्षानंतर भाजपचा भगवा फडकावला आहे. फक्त उमरेड या एकमेव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहेत.

नागपूरचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. हे बघता जिल्हा परिषद निवडणूक जिंकण्यासाठी सर्व वातावरण भाजपसाठी पोषक असल्याचे दिसून येते. बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागासुद्धा रिकामी झाली आहे. याकरिता भाजपला जिल्हा परिषद जिंकणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT