
नववर्षाच्या सुरुवातीलाच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन आज त्यांनी घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपणच रायगडचा पालकमंत्री होणार असून कथित एसटी घोटाळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने करत असतो. यंदा मंत्रिपद मिळाल्यामुळे जास्त आनंद आहे. गेल्या पंधरा वर्षाची तपश्चर्या फळाला आली. म्हणून सहकुटुंब देवीच्या दर्शनाला आलो असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली. महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आणि आयुष्यमान लाभो ही प्रार्थना असेल. एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. मला गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचता येईल असं खातं देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया गोगावले यांनी यावेळी दिली.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक मंत्र्यांनी खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे खातेवाटपावरून नाराजी असल्याचे चर्चा होते त्यावर बोलताना, नाराजी कोणाची ही नाही. एक-दोन दिवसात सर्वजण पदभार स्वीकारतील. मी देखील अद्याप पदभार स्वीकारलेला नाही उद्या जाऊन स्वीकारणार आहे. सगळेजण एक दोन खात्यावरच दावा केला तर तसं होऊ शकणार नाही. जे खात मिळालेलं आहे त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असा सल्ला गोगावले यांनी इतर मंत्र्यांना दिला आहे.
पालकमंत्री पदावरची निवड या आठवड्यात सर्वांनाच मिळेल. तर बऱ्याच लोकांची बीडचा पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वीकाराव अशी मागणी आहे. मात्र काय करायचं ते स्वतः मुख्यमंत्री ठरवतील. रायगड पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे, असं वाटत नाही. मी ज्येष्ठ आमदार आहे. गेल्यावेळी तो जिल्हा आमच्याकडे होता त्यावेळी मी मंत्री नव्हतो. आता मी स्वतः मंत्री आहे पालकमंत्री पद मला मिळेल अशी अपेक्षा आहे.
वाल्मिक कराड हा स्वतःहून हजर झाल्यानंतर, पोलीस प्रशासनावर अपयशाचा खापर फोडले जात आहे त्यावर बोलताना, अपयश असं म्हणता येणार नाही. पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. त्याला घाबरून त्यांनी शरणागती पत्करली. पोलीस त्यांचं काम चोखपणे करत होते वाल्मिक कराडला माहीत होतं. आज ना उद्या मी सापडणार आहे त्यामुळे त्याने स्वतः सरेंडर केलं, असल्याची प्रतिक्रिया गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिली.
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनामाची विरोधकांनी मागणी केली आहे. मात्र संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवतील. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर बरेचसे ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत आणि आमची सुरुवात देखील झालेली आहे. जे येतील त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल, असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.
एसटीच्या कथित घोटाळ्यावरून बोलताना भरत गोगावले यांनी, परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी नुकताच पदभार घेतलेला आहे. निवडणुकीच्या आधी पंधरा दिवस मला महामंडळाचा चार्ज मिळाला होता. मात्र आता ते संपूर्ण मंत्री आहेत. असं काही घडलं असेल तर त्याची चौकशी करून त्याला शासन होईल, असं स्पष्टीकरण मंत्री गोगावले यांनी दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.