Nawab Malik
Nawab Malik Sarkarnama
विदर्भ

Nawab Malik News : ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने मलिकांची भेट घेतली; विधिमंडळात रंगली एकच चर्चा

जगदीश पानसरे

Maharashtra Winter Session 2023 : हिवाळी अधिवेशनात कालपासून राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांचा विषय वादळी ठरत आहे. वैद्यकीय कारणामुळे जामिनावर असलेल्या मलिक यांनी विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी लावली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना नवाब मलिक यांच्यावर तेव्हा ज्या विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार हल्ला चढवला जात होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेने मालिकांची पाठराखण केली होती. मात्र आता मलिकांची सत्ताधारी पक्षासोबत असलेली उठबस आणि हजेरी पाहून ठाकरे गटाकडूनही महायुती सरकारवर हल्ला चढवला जात आहे. एकीकडे सभागृहात नवाब मलिक यांच्या विषयावर आक्रमक झालेल्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मलिक यांची मलिक यांची विधिमंडळ परिसरात भेट घेत विचारपूस केली.

'काय मलिक साहेब कसे आहात, प्रकृती बरी आहे ना? अशी विचारणा केली. 'काही नाही अनिल बरं आहे' असं म्हणत मलिक यांनी त्यांना प्रतिसाद दिला. अवघ्या काही सेकंदाच्या या भेटीमध्ये परब यांनी 'नवाब भाई मी तुम्हाला पुन्हा भेटतो' असे म्हणत त्यांचा निरोप घेतला.

राष्ट्रवादीतील बंडानंतर मलिक कोणत्या गटासोबत जाणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. दरम्यान, नवाब मलिक यांनी अजित पवार गटासोबत असल्याचे संकेत देत विधिमंडळातील त्यांच्या पक्ष कार्यालयात हजेरी लावली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र अजित पवारांना पाठवले होते' या पत्रावरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज दिवसभर नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात फिरत होते. बारकाईने सगळ्या मंत्री सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्या नजरेला नजरा मिळवत काहीतरी शोधत होते. त्यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचे संकेत देत आपली बैठक पक्ष कार्यालयातच मारली होती. दुसरीकडे माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे सगळेच नेते मात्र, नवाब मलिक यांचा राष्ट्रवादीशी काय संबंध? असा उलट सवाल करत होते.

Edited by Sachin Fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT