Winter Session 2023 : मलिक महायुतीत नको ; फडणवीसांच्या भूमिकेला शिंदे गटाचा पाठिंबा

Maharashtra Assembly Winter Session 2023 : "फडणवीसांची भूमिका योग्यच आहे,"
Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik
Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर नवाब मलिक कुणाचे? हा प्रश्न विचारला जात असताना हिवाळी अधिवेशनात मलिकांनी सत्ताधारी बाकावर बसत अजित पवार गटाला पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

मलिकांना महायुतीत सहभागी करू नका, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेत अजित पवारांना पत्र लिहिलं. फडणवीसांच्या भूमिकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते, प्रवक्ते संजय शिरसाट, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समर्थन केले आहे. "फडणवीसांची भूमिका योग्यच आहे," असे शिरसाटांनी माध्यमांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत दिसणारे नवाब मलिक काल हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बसले. त्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. या विषयावरून राजकारण पेटलं असता फडणवीसांनीपत्र लिहून अजितदादांना देशद्रोहाचा खटला सुरू असलेल्या मलिकांना महायुतीमध्ये सहभागी करू नका असं म्हणत आपला आक्षेप नोंदवला आहे.

फडणवीसांच्या या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत."अजितदादा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना जात धर्मापेक्षा, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा, हे तुम्ही दाखवून द्या", असे थेट चॅलेंज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी अजित पवारांना दिले आहे. याबाबत त्यांनी सविस्तार फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik
Nagpur Winter Session 2023 : अंबादास दानवेंची 'गुगली'...नीलेश लंके 'क्लीन बोल्ड'

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी विरोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवाब मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करत, खोचक टीका केली आहे. अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हते, असे सांगून खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे पोपटलाल (किरीट सोमय्या) यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त नवाब मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची…, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis and Ajit Pawar and Nawab Malik
Nagpur Winter Session 2024 : कार्यालय नसलं तर पायऱ्यांवर बसू; पण जनतेचे प्रश्न मांडू...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com