Chandrapur Medical College Sarkarnama
विदर्भ

Attack On Doctor : उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच हल्ला! कसाबसा वाचवला जीव; नेमकं काय घडलं?

Chandrapur Government Hospital : चंद्रपुरातील प्रकाराने डॉक्टरांचा संताप, केला निषेध

संदीप रायपूरे

Chandrapur News : अतिदक्षता विभागात गंभीर आजारी असलेल्या आठवर्षीय मुलीवर उपाचार करणाऱ्या डॉक्टरवर दोघांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हा प्रकारामुळे घाबरलेल्या डॉक्टरने पळ काढून आपला जीव वाचवल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत उपचार करण्यात आले. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा डॉक्टरांनी निषेध व्यक्त करीत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Latest Political News)

हा प्रकार चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी रात्री अकरा वाजता घडला. अधिक माहितीनुसार, डॉ. रोहित तोरे हे अपघात विभागात रात्री अकरा वाजता रुग्णावर उपचार करीत होते. त्याचवेळी चंद्रपुरातील नगिना बाग, दुर्गापूर येथील दोघांनी साजिद शेख व सुलतान खान हे दोघे तेथे आले. आपल्या मुलीच्या पोटात खूप दुखत असून, उपचार करण्याची त्यांनी विनंती केली. अपघातग्रस्तावर उपचार केल्यानंतर डॉ. होरेंनी मुलीवर उपचार करणे सुरू केले. याचवेळी उशीर झाल्याचा आरोप करत त्या दोघांनी होरेंना मारहाण करण्यास सुरुवात केली. (Maharashtra Political News)

अचानक झालेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात एकटे असलेल्या व घाबरलेल्या डॉ. होरेंनी तेथून पळ काढला. यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार सतीशसिंह राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साजिद शेख व सुलतान खान या दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अनेक शिकाऊ डॉक्टरांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध केला. तत्परता दाखवत उपचार सुरू केल्यानंतरही शिवीगाळ आणि मारहाण होत असेल तर हा अतिरेकाचा कळस झाल्याची तीव्र प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली. (Chandrapur News)

आठ महिन्यांत दुसरा प्रकार

चंद्रपुरात डाॅक्टरांना मारहाण करण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठ महिन्यांत दोनदा असा प्रकार घडला आहे. यामुळे डॉक्टरांत भीतीचे वातावरण आहे. चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाल्यानंतर अनेक रुग्णांसाठी हे महाविद्यालय आशेचा किरण ठरले आहे. पण असे असतानाही मारहाणीच्या प्रकारात वाढ होत असल्याने मनोबल खचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुरक्षारक्षक नेमा

रुग्णालयात मारहाण झाल्यानंतर डॉक्टरांनी तीव्र संताप व्यक्त केला. वैद्यकीय महाविद्यालयात दररोज जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील हजारो रुग्ण येतात. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येतो. मात्र, काही माथेफिरूंमुळे डॉक्टरांसह इतर रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. असे प्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयात सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT