Hardeep Singh News : हरदीपसिंगच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर; पाकिस्तान गुप्तचर संस्थेकडून...

India Vs Canada : राहत राव आणि तारिक कियानी हे कॅनडातील दोन आयएआय एजंट जे पाकिस्तानसाठी काम करतात. त्यांचा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Justin Trudeau, Narendra Modi
Justin Trudeau, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडाे यांनी केला. भारताने कॅनडाचा आरोप फेटाळून लावताना हा आरोप मूर्खपणाचा आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. या घटनेत नवी माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ने ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अनेक माजी सनदी अधिकारी, लष्कराचे अधिकारी हे हरदीपसिंग निज्जरच्या शेजारी राहतात. राहत राव आणि तारिक कियानी हे कॅनडातील दोन आयएआय एजंट जे पाकिस्तानसाठी काम करतात. त्यांचा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोघांचा त्यांच्या हत्येमध्ये काही व्यावसायिक कारणासाठी आणि निज्जर अत्यंत सजग आणि सावध असल्याने त्याच्या जवळ जाणे कुणालाही शक्य नव्हते, असे सूत्रांकडून समजते. या दोघांपैकी एकाला निज्जरची हत्या करण्याचे काम देण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Justin Trudeau, Narendra Modi
Kolhapur Politics News : दक्षिणच्या राजकारणात दोघांत तिसरा? राजेश क्षीरसागरांनी टाकली गुगली...

जस्टिन ट्रुडाे यांनी केलेला आरोप भारताने फेटाळून लावला आहे. हा आरोप मूर्खपणाचा आणि निरर्थक असल्याची टीका केली आहे. कॅनडाने निज्जरच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रॉ च्या कॅनडातील केंद्र प्रमुखांची हकालपट्टी केली. त्यानंतर भारतानेही जशास तसे उत्तर दिले असून, भारतातील कॅनडाच्या सहायक उच्चायुक्तांची हकालपट्टी केली.

कॅनडात जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. हरदीपच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप कॅनडाने केला. यावर भारतानेही पुरावे द्या, हवेत बोलू नका, असे त्यांना खडसावले. त्यानंतर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंगने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी कारवायाचे प्रशिक्षण घेतले होते. कॅनडामध्ये तो दशतवाद्याचे कॅम्प चालवीत असल्याचे पुढे आले आहे. त्यावर भारतावर मोठ्या प्रमाणात आरोप करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो गप्प का, असा खडा सवाल विचारला आहे.

२०१२ मध्ये हरदीपसिंगने पाकिस्तानमध्ये जाऊन काही दिवस त्याने दहशतवादी कारवायांचे ट्रेनिंग घेतले होते. हे ट्रेनिंग पंधरा दिवस चालले होते. या वेळी त्यांनी विविध हत्यारांचा वापर करण्याचे ट्रेनिंग घेतले होते. पाकिस्तानातून आल्यानंतर त्याने दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी उभारण्याचे काम केले होते. त्यासाठी त्याने हत्याराची व ड्रगची तस्करी केल्याचे पुढे आले आहे.

Edited By : Mangesh Mahale

Justin Trudeau, Narendra Modi
Ajit Pawar Viral Note: लालबाग राजाच्या चरणी अजितदादांच्या कार्यकर्त्याने ठेवलेली 'ती' चिठ्ठी व्हायरल; अजितदादांना लवकरात लवकर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com