Chandrapur News : चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली-चिमूरचे भाजपचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा सोमवारी चंद्रपुरात पार पडली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कारभारावर टीका करीत निशाणा साधला. देशभरातील विरोधकांकडे ना झेंडा ना अजेंडा आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी वाभाडे काढले.
राज्यातील महाविकास आघाडी (MVA) सरकारने त्यांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामांना ब्रेक लावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचा विकास नाही, तर स्वत:चा आणि स्वत:च्या कुटुंबीयांच्या विकासासाठी काम केलं, अशी टीका नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केली. (PM Narendra Modi News)
भाजप सरकारच्या काळात राज्यात जलयुक्त शिवार योजना बंद केली, त्याशिवाय सिंचन प्रकल्प बंद केला. विदर्भ विकासासाठी मी समृद्धी महामार्ग लोकार्पण केले, त्यालाही काँग्रेसने विरोध केला. मराठवाड्यासाठी असणारी वॉटर ग्रीड योजना आघाडी सरकारच्या काळात बंद केली. मुंबई मेट्रो, रिफायनरी बंद केली. गरिबांना घरे देणारी योजना ठप्प पाडली, असा आरोप या वेळी मोदींनी केला.
आमच्या सरकारने या सगळ्या योजना पुन्हा सुरू केल्या आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचं सरकार गेल्या काही दिवसांपासून रात्रंदिवस काम करत आहे. लोक मोदी सरकारला आपलं सरकार मानतात, असेही या वेळी ते म्हणाले.
नकली शिवसेनेवाले हे हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या डीएकमेवाल्यांना महाराष्ट्रात आणून रॅली करतात, असे सांगत मोदींनी ठाकरेंवर टीका केली. त्यासोबतच या वेळी त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली असल्याचे म्हणत त्यांच्यावर हल्ला चढविला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सरकारच्या कामगिरीचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
R