Krishna Khopde: बेरोजगार तरुणांच्या हतबलतेचा फायदा घेण्याच्या उद्देशानं त्यांना नोकरीचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचे अनेक प्रकार आजपर्यंत आपण पाहिले आहेत. पण आता चक्क एका आमदाराच अशा प्रकारे बँकेत नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवणारा फोन आल्यानं खळबळ उडाली आहे. सत्ताधारी भाजपच्या आमदाराबाबतच हा प्रकार घडल्यानं त्याची सध्या चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली असून याची चौकशी आता पोलीस करत आहेत.
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. खोपडे यांना स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी लावून देणारा एक संशयास्पद फोन आला. 'बँक मॅनेजर रोहित' असं मोबाईलच्या कॉलर आयडीवर या फोन करणाऱ्याचं नाव झळकलं होतं. विशेष म्हणजे या फोन करणाऱ्याला आपण आमदाराला फोन केला असल्याचं ठावूक असतानाही त्यानं चक्क नोकरीच्या आमिषानं गंडा घालण्याचा प्रयत्न केला.
फोनवरुन संबंधित व्यक्तीनं आमदार खोपडे यांना म्हटलं की, "नोकरीची गरज असलेल्या तीन उमेदवारांची तासाभरात नाव पाठवा", त्यानंतर पुन्हा त्याच फोन क्रमांकावर रिडायल केल्यानंतर फोन क्रमांक स्विचऑफ लागत असल्याचंही दिसून आलं आहे.
या प्रकाराबाबत माहिती देताना आमदार कृष्णा खोपडे सांगतात, "मोबाईलवरुन आमिष दाखवताना हे लोक इतकं गोड गोड बोलतात की त्यामुळं अनेकांची फसवणूक होते. बँकेतून पैसे गायब करणं, ओटीपी मागणं अशा विविध प्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार आपण रोज वर्तमानपत्रांमध्ये वाचतो. असंच प्रकरण माझ्या लक्षात आलं म्हणून मी याची दखल घेतली, पण यांच्यामार्फत अनेक लोक असे फसले असतील.
त्यामुळं अशा फसवेगिरीवर अंकुश राहावा, अशा लोकांवर कडक कारवाई व्हावी या उद्देशानं मी तक्रार दाखल केली आहे. नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन होईल, त्यावेळी मी निश्चित स्वरुपात सरकारचं या गोष्टीकडं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच अशा प्रकारच्या लोकांवर उच्चस्तरीय कडक कारवाई व्हावी त्या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करतो आहे" असंही आमदार कृष्णा खोपडे यांनी सागितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.