Congress spokesperson Atul Londhe criticizes BJP leaders, questioning their role as unofficial representatives of the Election Commission.  Sarkarnama
विदर्भ

Atul Londhe -''भाजपचे नेते आयोगाचे प्रवक्ते केव्हापासून झाले'' ; काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा सवाल!

Atul Londhe Challenge to Election Commission - आमचे आरोप खोटे आहेत, राजकीय आहेत असे आयोगाला वाटत असले तर त्यांनी पुरावे द्यावे, असं आव्हानही केलं आहे.

Mayur Ratnaparkhe, Rajesh Charpe

Atul Londhe Questions BJP’s Role in Election Commission Statements - विधानसभा निवडणुकीतील मॅचफिक्सिंगच्या आरोपावरून महाराष्ट्रात भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राहुल गांधी यांनी थेट भाजपने विधानसभा चोरल्याचा आरोप केला आणि निवडणूक आयोगाला काही प्रश्नांची उत्तरे मागितली.

मात्र आयोगाऐवजी भाजपचेच नेते उत्तरे देत आहेत. त्यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपचे नेते आयोगाचे प्रवक्ते केव्हापासून झाले असा टोला लगावला. आम्ही ज्यांना प्रश्नच विचारत नाही ती मंडळी उत्तरे का देतात, असा सवाल करून त्यांनी ‘चोराच्या मनात चांदणे‘ असल्याशिवाय कोणी पुढाकार घेत नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीवर अनेकांना शंका आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहे. विदर्भातील सुमारे २७ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीच्या निकाला विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. सीसीटीव्ही, व्हीव्हीपॅट आणि निवडणुकीशी संबंधित दस्तावेजाची मागणी त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाकडे केली आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणारे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचाही समावेश आहे.

दरम्यान हरियाणात पराभूत झालेले उमेदवार उच्च न्यायालयात गेले होते. कोर्टाने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे आदेश आयोगाला दिले आहे. यानंतर अचानक काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यानुसार आयोगाला निवडणुकीशी संबंधित डेटा ४५ दिवसांत नष्ट करण्याचे अधिकार मिळाले आहे. त्यामुळे मॅचफिक्सिंग शक्यता आणखीच बळावल्याचे बोलले जात आहे.

यावर अतुल लोंढे म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिक दाखल केल्या आहेत. आयोगाकडे सीसीटीव्ही फुटेज व निवडणुकीशी संबंधित माहिती मागवली आहे. त्याची उत्तरे आम्हाला आयोगाकडूनच अपेक्षित आहे. मात्र भाजपचे नेते आणि मंत्रीच त्याची उत्तरे देत आहेत. आयोगाने खरी माहिती वा उत्तरे दिली तर आपण उघडे पडू अशी भीती भाजपच्या नेत्यांना सतावत असावी असेही ते म्हणाले.

तसेच, महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात दुष्टाळ पडला आहे. शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यावर एकही मंत्री बोलत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आम्ही ज्या मतदारसंघाची माहिती मागतो ती दिली जात नाही. उलट तुमचेही उमेदवार निवडून आले, त्यांच्याही मतदारसंघात मतदार वाढले असे सांगितले जाते. ज्या प्रश्नांची उत्तरे मागतोय ती सोडून दुसरीच माहिती पुरवली जाते. हा सर्व खटाटोप नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी व त्यांची दिशाभूल करण्यासाठी भाजपचे नेते करीत आहेत. असा आरोप लोंढे यांनी केला.

महाराष्ट्रात सज्ञान मतदारांची संख्या राज्यातील एकूण लोकसंख्येपेक्षा कशी वाढली याचे उत्तर कोणी देत नाही. मतदारांचा आकडा लाखोंच्या संख्येने वाढला. एका मतदार नोंदणीला तीन मिनिटांचा सरासरी वेळ लागतो. तो एक मिनिट धरला तरी पाच महिन्यात एवढ्या मतदारांची नोंद करणे शक्य नाही. आमचे भांडण भाजप वा विरोधकांसोबत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत. आयोगाने आमच्या शंका दूर केल्या पाहिजे. निवडणुकीची पारदर्शकता राखली पाहिजे. आमचा विरोध व आंदोलन लोकशाहीसाठी आहे. ठोकशाहीच्या विरोधात असल्याचे अतुल लोंढे यांनी सांगितले.

आमचे आरोप खोटे आहेत, राजकीय आहेत असे आयोगाला वाटत असले तर त्यांनी पुरावे द्यावे, आमच्या प्रश्नांची लेखी उत्तर द्यावी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देऊन आम्हाला खोटे ठरवा, असे आव्हानही देऊन अतुल लोंढे पळू नका तर उत्तरे देण्याची मागणी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT