
RahuI Gandhi Allegation and Devendra Fadnavis response : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत, निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधणाऱ्या राहुल गांधींनी आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदासंघातही घोटाळ्याचा मोठा आरोप केला होता. ज्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांन उधाण आलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात सहा महिन्यात तब्बल 29 हजार मतदार वाढले, काही बूथवर 20-50 टक्के वाढ दिसून आली. बूथ लेव्हल ऑफिसरने अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याची तक्रार नोंदवली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनीही राहुल गांधींना त्यांच्याच महाविका आघाडीच्या विजयी आमदारांच्या मतदारसंघाची उदाहरणं देत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधींच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीटद्वारे प्रत्युत्तर देत म्हटले, ‘’झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो… राहुल गांधी, मान्य आहे की महाराष्ट्रातील दारूण पराभवाचे तुमचे दु:ख दिवसेंदिवस वाढतच जात आहे. परंतु तुम्ही किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तसं तर तुमच्या माहितीसाठी, अशी २५ पेक्षा अधिक मतदार संघ आहेत, जिथे आठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढले आहेत आणि अनेक जागांवर काँग्रेस जिंकली आहे.’’
‘’माझ्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाशी लगत असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात सात टक्के(२७,०६५)टक्के मतदार वाढले आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे विजयी झाले आहेत. उत्तर नागपूरमध्ये सात टक्के (२९,३४८) मतदार वाढले आहेत आणि तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले आहेत.’’
याशिवाय, ‘’पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी मतदरासंघात १० टक्के(५०,९११) मतदार वाढले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. तसेच, मालाड पश्चिम मतदारसंघात ११ टक्के(३८,६२५) मतदार वाढले आणि तिथेही तुमच्याच काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. तर मुंब्रामध्ये ९ टक्के(४६,०४१) मतदार वाढले आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.’’
‘’मित्र पक्षांशी भलेही नाही, मात्र आपल्या पक्षाच्या अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांच्यासारख्या जुन्या सहकाऱ्यांशी या ट्वीटच्या आधी किमान एकदा बोलला असता, तर बरं झालं असतं. किमान काँग्रेसमधील संवादाच्या अभावाचे एवढे वाईटप्रकारे प्रदर्शन तरी नसते झाले.’’
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.