Congress On BJP : कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देतात. हातपाय तोंड, डोळे काढू, अशी भाषा करतात. चिथावणीखोर भाषण देतात. आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती. अतुल लोंढे यांनी यासंदर्भात सरकारने थेट कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिस आपले काहीच वाकडे करू शकत नाहीत, असे नमूद करीत राज्यात पोलिसांना आव्हान देण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिस कायद्याला आव्हान देणाऱ्यांना धडा शिकवतात. असाच धडा त्यांनी कायदा मोडणाऱ्या राजकारण्यांनाही शिकवावा, असे लोंढे म्हणाले.
भाजप सरकारचा समाचार घेत अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात गुंडगिरी करणारे अनेक जण आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे सांगतात. सांगर बंगला कोणाचा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे गृहविभागाकडून गावगुंडांना संरक्षण देण्याचे काम होत आहे काय? असा सवालही लोंढे यांनी केला. सरकार आणि त्यातील मंत्री कान, डोळे बंद करून कुंभकर्णी झोप घेत आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांचे उघड गुन्हे करण्याचे धाडस होत आहे. काही नेते तर थेट पोलिस ठाण्यात जात गोळीबार करीत आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला न शोभणारा आहे. यूपी, बिहारसारखी गुंडगिरी राज्यात सुरू झाल्याचा घणाघातही अतुल लोंढे यांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढतील आणि स्वतःच्या बायकोला दाखवतील, मी येथे आलो तर तुम्हाला कायदा सुव्यवस्था सांभाळणे मुश्कील होईल’, अशी भाषा करणे म्हणजे पोलिसांची खिल्ली उडविण्यासारखेच आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात विविध पक्षांचे सरकार होते. परंतु पोलिसांची अशी जाहीर खिल्ली कोणीच उडविली नाही. महिलांचा अपमान करणारी व थेट पोलिसांना आव्हान देणारी भाषा कोणीच वापरली नाही. आता मात्र सत्ताधारी अशी भाषा वापरत आहे. हा सर्रास कायद्याचा अपमान आहे. पोलिसांना डिवचण्याचा प्रकार आहे. महिलांचाही अपमान आहे, असे लोंढे स्पष्टपणे म्हणाले.
भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या नेत्यांनी अशी गुंडगिरीची भाषा मान्य आहे का? सत्ताधारी आमदार हे काय कायद्यापेक्षा मोठे आहेत का? या गुंडाछाप दोन कवडीच्या नेत्यांवर कारवाई करताना शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्या हाताला लकवा मारतो का? असा संतापही अतुल लोंढे यांनी व्यक्त केला. भडकाऊ भाषण देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. परंतु भाजपच्या राज्यात कायदा तर धाब्यावर बसवला आहेच, पण कोर्टालाही हे जुमानत नाहीत. हा सत्तेचा माज आहे, असेही लाेंढे म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.