Nagpur Politics : फडणवीसांच्या गडात काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्या नावानं फलकबाजी

Diwali Poster in Nagpur : नागपुरात शुभेच्छांच्या बॅनर्सनं राजकीय वर्तुळात चर्चा
Banner of Atul Londhe in Nagpur
Banner of Atul Londhe in NagpurGoogle
Published on
Updated on

Congress Vs BJP : दिवाळीच्या निमित्तानं काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांच्या होर्डिंगबाजीनं नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. लोंढे यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात लागल्यानं आगामी निवडणुकीसाठी लोंढे तयारी तर करीत नाही ना, अशा चर्चांना सुरुवात झालीय.

अतुल लोंढे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहेत का, अशी विचारणा भाजप व काँग्रेस दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना करीत आहेत. लोंढे यांच्या या बॅनर्समुळे नागपूरच्या राजकारणात ऐन दिवाळीत नवीन फटाका फुटलाय. (Congress Spokesperson Atul Londhe's Posters in Nagpur South West Assembly Constituency Belongs to Devendra Fadnavis of BJP)

शहरात हे फलक लागल्यानंतर अनेकांनी अतुल लोंढे यांच्याशी संपर्क साधत त्यांना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छाही देऊन टाकल्या, तर आपल्या मतदारसंघात हे पोस्टर्स लागल्यानं भाजप नेते व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. नागपूरचा दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ भाजपचा गड आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ. सध्या या मतदारसंघातून काँग्रेसजवळ कोणताही तगडा उमेदवार नाही. त्यामुळं अतुल लोंढे यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या घरासमोरच अतुल लोंढे यांच्या नावाचे हे होर्डिंग्ज लागले आहेत. ‘दक्षिण पश्चिम मतदारसंघातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा’ या आशयाचा हा फलक आहे. त्यावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोटो आहे. हे पोस्टर्स पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे पूर्व नागपूर मतदारसंघात राहतात. परंतु त्यांचे बॅनर फडणवीसांच्या मतदारसंघात लागले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘मी स्वतः कोणतेही बॅनर्स लावलेले नाहीत. असे बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले असावेत. कदाचित त्यांना असं वाटत असावं की, दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढण्यासाठी मी सक्षम नेता आहे, असं काही असू शकते. या बॅनर्सवर ते कुणी लावले त्याचा उल्लेख केलेला नाही,’ असे अतुल लोंढे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले. खरंच दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढणार आहात का, असे विचारले असता यावर अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळं लोंढे यांचा नामोल्लेख असलेले बॅनर कुणी लावले हा प्रश्न अनुत्तरित आहे. मात्र, या फलकबाजीमुळं त्यांच्या नावाची चर्चा भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालीय ही वस्तुस्थिती आहे.

Edited by : Atul Mehere

Banner of Atul Londhe in Nagpur
Nagpur Assembly Session : 'दहा दिवसांचं अधिवेशन म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ वाटला का?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com