Subhodh Saoji Letter Sarkarnama
विदर्भ

Subhodh Saoji Letter : राम मंदिर कथित देणगी गैरव्यवहार; ट्रस्टचा कारभार लष्कराकडे द्या, सुबोध सावजींचे राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रानं खळबळ

Congress Leader Subhodh Saoji Seeks Army Oversight For Ram Temple : विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा कारभाराबाबत मोठी मागणी केली आहे.

Pradeep Pendhare

Summary

  • राम मंदिर देणगी गैरव्यवहारावर सुबोध सावजी यांचे पत्र

  • राम मंदिर ट्रस्ट भारतीय लष्कराकडे द्यावी मागणी

  • शेगाव गजानन महाराज संस्थेकडे राम मंदिर कारभार

Ram Mandir Trust Latest News : अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच विदर्भातील काँग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा कारभार भारतीय लष्कर किंवा शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थेकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटले आहे की, राम मंदिरातील (Ram Mandir) कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे देशाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थेच्या प्रशासनाचा तसेच भारतीय लष्कराच्या (Indian Army) शिस्तबद्ध आणि पारदर्शक कार्यपद्धतीचा उल्लेख करत, या दोन पर्यायांपैकी एका संस्थेकडे मंदिराचा कारभार देण्याची सूचना सुबोध सावजी यांनी पत्राद्वारे केली आहे.

सुबोध सावजी यांनी कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्याचा उल्लेख

पत्रात सुबोध सावधी यांनीराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्याचा उल्लेख केला आहे. त्या वेळी राष्ट्रपतींनी श्री गजानन महाराज संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक केल्याचे सांगत, त्याच धर्तीवर राम मंदिराच्या व्यवस्थापनाचा विचार करण्याची विनंती त्यांनी केली आहे.

प्रकरणावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया

राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणावर विविध राजकीय पक्षांतील नेते तसेच हिंदुत्ववादी संघटनांतील काही पदाधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी भाजप नेते आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी राम मंदिर ट्रस्टशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला होता. त्यांनी केलेल्या आरोपांवर संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

एसआयटीमार्फत चौकशी सुरू

या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथक (SIT) चौकशी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील आरोपांबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहेत.

आरोपींकडून रोख रक्कम जप्त

तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अविनाश शुक्लाकडून 20.39 लाख, करुणेश पांडेकडून 18.07 लाख, अनुकल्प मिश्राकडून 16.82 लाख, लवकुश मिश्राकडून 14.25 लाख, रामाशंकर मिश्राकडून 7.32 लाख आणि रामाशंकर यादव उर्फ टिन्नूकडून एक लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

'रामराज्य कोष'बाबत धक्कादायक माहिती

तपासादरम्यान 11 ग्रॅम सोने, 375 ग्रॅम चांदी आणि 1,021 अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच अयोध्येतील एका योग केंद्रातून 'रामराज्य कोष' असे नाव असलेली आणि पेटीएम QR कोड लावलेली संशयास्पद देणगी पेटीही जप्त करण्यात आली आहे.

FAQs

1. राम मंदिर देणगी गैरव्यवहार प्रकरण काय आहे?

राम मंदिराशी संबंधित कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांची उत्तर प्रदेश पोलिसांच्या SIT मार्फत चौकशी सुरू आहे.

2. सुबोध सावजी यांनी कोणती मागणी केली?

राम मंदिराचा कारभार भारतीय लष्कर किंवा शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थेकडे सोपवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली.

3. सुबोध सावजी यांनी पत्र कोणाला लिहिले?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना.

4. प्रकरणाची चौकशी कोण करत आहे?

उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT).

5. या प्रकरणात काय जप्त करण्यात आले?

रोख रक्कम, सोने, चांदी, अमेरिकन डॉलर आणि 'रामराज्य कोष' नावाची संशयास्पद QR कोड असलेली देणगी पेटी जप्त करण्यात आली.

6. शेगाव संस्थेचा उल्लेख का करण्यात आला?

पारदर्शक आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे उदाहरण म्हणून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT