Police strengthen security near Ramgiri Bungalow as Bacchu Kadu supporters gather in Nagpur for a major protest. Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu Protest: बच्चू कडूंच्या तावडीत सापडले भाजप आमदार; तब्बल चार तास गाडी ठेवली अडवून

Nagpur farmer protest News update:भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे आमदार बकाने चांगलेच गोंधळून गेले होते.

Rajesh Charpe

Nagpur News: संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू आपल्या हजारो समर्थकांसह नागपूरच्या रस्त्यावर ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे सर्वत्र कोंडी झाली आहे. वर्धा मार्गाने शहरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. आक्रमक आंदोलकांच्या तावडीत सापडल्याने वर्धा जिल्ह्यातील देवळी पुलगावचे भाजप आमदार राजू बकाणे यांचीही चांगलीच कोंडी झाली होती. त्यांना आंदोलकांनी तब्बल चार तास रोखून ठेवले होते.

राजू बकाणे हे प्रथमच निवडून आले आहेत. आंदोलन स्थळावरून गाडीतून जात असताना त्यांना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली. तुम्ही भाजपचे आमदार आहात. सरकारमध्ये आहात. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर करण्यात आली. त्यामुळे आमदार बकाने चांगलेच गोंधळून गेले होते.

बकाने यांनी कर्जमाफीचा मुद्दा प्रचारात मांडला होता. आता सभागृहातही मांडणार हे आश्वासन देऊन त्यांनी कशीबशी त्यांना आंदोलकांची समजूत काढून आपली सुटका करून घेतली. मात्र यामुळे त्यांना चार तास गाडीत अडकून पडावे लागले. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे मंगळवार सायंकाळपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पाचशे ट्रॅक्टर रस्त्यावर लावण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हजारो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून कार्यकर्त्यांच्या गाड्या आंदोलनस्थळी आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. कालपासूनच या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले आहे.

प्रवासी बस, ट्रॅवल्स, चारचाकी गाड्याच अडकून पडल्या आहेत. कडू यांच्या आंदोलक आता रेल्वे ट्रॅकवरसुद्धा पोहचले आहेत. रस्ते वाहतुकीसोबतच आता रेल्वेही बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. कडू यांनी सरकारचे मुंबईला चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण धुडकावून लावले आहे. सरकारनेच आंदोलनस्थळी चर्चेसाठी यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आणखीच पेच निर्माण झाला आहे. हे आंदोलन संपवण्यासाठी युद्धस्तरावर सरकार प्रयत्न करीत आहे. बच्चू कडू यांच्यासोबत शिष्टाई करण्यासाठी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT