Bacchu Kadu’s health worsens as he continues his hunger strike protest in Maharashtra.  sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu Health Upadte : प्रकृती ढासळली, चार किलो वजन घटले तरी बच्चू कडू ठाम; म्हणाले, 'फक्त आश्वासन नाही...'

Bacchu Kadu Hunger Strike Protes : बच्चू कडूंची प्रकृती खालावली असताना त्यांनी उपचार घ्यावेत, अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. मात्र,ते आंदोलनावर ठाम आहेत.

Roshan More

Bacchu Kadu News : माजी आमदार, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू हे मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. गुरूकूंज मोझरी येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रमुख मागणीसह त्यांच्या 17 मागण्या आहते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कडू यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचा बीपी कमी होतोय आहेत. त्यातच त्यांचे वजन तब्बल चार किलोने कमी झाले आहे.

बच्चू कडूंची प्रकृती खालावली असताना त्यांनी उपचार घ्यावेत, अशी विनंती त्यांना करण्यात येत आहे. मात्र,ते आंदोलनावर ठाम आहेत. मुख्मयंत्र्यांसोबत बैठक झाल्याशिवाय आणि ठोस आश्वसान दिल्याशिवाय माघार घेणार नाही, असे कडू यांनी स्पष्ट सांगितले आहे.

फक्त आश्वासन देऊन आंदोलन मागे घेणार नाही, हे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी व्हिसीद्वारे मिंटींग घ्यावी, असे देखील त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असताना प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. बच्चू कडूंचे पुत्र आणि भाऊ हे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

मंत्री बावनकुळे यांच्यासोबत चर्चा

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्यासोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी देखील आपल्यासोबत चर्चा केली. मंत्र्यांची व्हिसीद्वारे बैठक घेण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कडू यांनी आंदोलन करत असलेल्या प्रहारच्या कार्यकर्त्यांना आवाहन केली की उग्र आंदोलन हे 14 तारखेनंतर करावे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. या टीकेला कडू यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, विखे पाटलांनी शेतकऱ्यांचे 90 कोटी रुपये खालले. ते शेतकऱ्यांना लुटणारे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT