Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu News : कार्यकर्त्यांचा हट्ट अन् बच्चू कडूंची चुप्पी; ‘प्रहार’चं काय चाललंय भंडारा जिल्ह्यात?

अभिजीत घोरमारे

Bhandara District Political News : भंडारा जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते सध्या पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंवर चांगलेच नाराज झाले आहेत. आमदार बच्चू कडू त्यांचा एक हट्ट पुरवत नसल्याने कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचे बोलले जात आहे. १४ ऑक्टोबरला दिव्यांग मेळाव्यासाठी कडू भंडाऱ्यात येणार आहेत. तेव्हा कार्यकर्ते त्यांच्याकडे आग्रह करणार असल्याची माहिती आहे. (It is known that activists will urge them)

२०२४मध्ये भंडारा-पवनी विधानसभा मतदारसंघात प्रहारने स्वतःचा उमेदवार उभा करून स्वबळावर निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा हट्ट आहे. यासाठी भंडारा प्रहारची ‘अंकुश वंजारी टीम’ कामाला लागली आहे. भंडारा-पवनी विधानसभेत निर्माण झालेली राजकीय खिचडी मुद्दामहून केली जात आहे. या राजकीय खिचडीत आपला फायदा कसा होऊ शकतो, हेसुद्धा कार्यकर्ते पटवून देत आहेत.

पक्षाध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याकडून अद्याप हिरवा झेंडा न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. बच्चूभाऊंकडून कधी परवानगी मिळते आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपली ताकद केव्हा दाखवतो, असे काहीसे कार्यकर्त्यांचे झाले आहे. पण या विषयावर आमदार कडू गप्प का, हे कार्यकर्त्यांना न उलगडलेले कोडे आहे. भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राबाबत अद्याप त्यांनी आपले ‘पत्ते’ उघडलेले नाहीत.

भंडाऱ्यातील प्रहार कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. नाराजीतून ही अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. ही बाब अंकुश वंजारी टीमकडून सतत बच्चू कडूंच्या कानावर टाकली जात आहे. बच्चू कडूंनी हट्ट पुरवावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.

येत्या १४ ऑक्टोबरला दिव्यांग कार्यक्रमाला येणाऱ्या आमदार कडूंना पुन्हा या कार्यकर्त्याच्या हट्टाला सामोरे जावे लागणार आहे. आता बच्चू कडू यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. प्रहारने आपला उमेदवार २०२४च्या विधानसभा निवडणुकीत उभा केल्यास येथील राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्‍चित.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT