Bacchu Kadu and Sachin Tendulkar Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu on Tendulkar : तारीख ठरली, बच्चू कडू ‘या’ दिवशी पाठवणार सचिन तेंडुलकरला नोटीस !

सरकारनामा ब्यूरो

Amravati Politics News : ऑनलाइन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना भोवणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑनलाइन गेमची जाहिरात सचिन तेंडुलकर यांनी केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना येत्या ३० तारखेला वकिलांमार्फत ते कायदेशीर नोटीस बजावणार आहेत. (They are going to issue legal notices through lawyers)

आज (ता. २८) अमरावतीमध्ये पत्रकारांशी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले, सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत आणि राज्यसभा सभागृहाचे खासदार राहिलेले आहेत. अशा व्यक्तीने कुठल्या जाहिराती कराव्या आणि कुठल्या करू नये, याची आचारसंहिता आहे, त्यामुळे आता तेंडुलकरला वकिलांमार्फत नोटीस पाठवल्यानंतर पुढील आंदोलनाची घोषणा करू.

सचिन तेंडुलकर यांच्याकडून केवळ पैशाच्या हव्यासापोटी जाहिरात करून तरुण मंडळीला गेमींगमध्ये ओढले जात असेल, तर याचा आम्ही विरोध करतो. तशी सूचना आम्ही त्यांना दिली होती आणि ३० ऑगस्टपर्यंतचा वेळ त्यांना दिला होता. पण आजवर त्यांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला नाही. त्यामुळे येत्या ३० तारखेला आमच्या वकिलांमार्फत सचिन तेंडुलकर यांना नोटीस पाठवणार आहो, असे आमदार कडू म्हणाले.

माजी क्रिकेटपटू असलेले सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे. भारतरत्न असणाऱ्या व्यक्तीने जुगाराला प्रोत्साहन देणाऱ्या जाहिराती करणे, योग्य नाही. ‘पेटीएम फर्स्ट गेम’ या जुगाराची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करीत आहेत. तेंडुलकर हे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आहेत.

भारतात (India) लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत त्यांचे चाहते आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहिरातीचा परिणाम लहान, थोर अशा सर्व स्तरांपर्यंत होतो. अशा जुगाराच्या जाहिरातीला महाराष्ट्रातील (Maharashtra) जनता बळी पडत आहे. अनेकांचं कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्त देखील होत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी बऱ्याच जणांकडून माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत, असे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT