Kolhapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या दोघांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही, असे जाहीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार हे सातत्याने विरोधकांना संभ्रमात टाकताना दिसत आहेत. अनेकांना पवारांचा गेम काय आहे? हे कळायला मार्ग नाही. यावर आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार यांच्यावरच प्रहार केला. (...This is the NCP's big game: Bacchu Kadu's attack on Pawar's statement)
शरद पवार यांच्या वक्तव्याकडे लक्ष दिले तर डोकं फुटायची वेळ येईल. पवार जे बोलतात ते करत नाहीत. शिवसेना फुटल्यानंतर जे घडलं, तसे राष्ट्रवादीत होताना दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मोठा गेम आहे. त्यांचा गेम म्हणजे थेट ऑलिंपिकच असू शकेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन ते तीन रस्ते पाहून ठेवले आहेत. सगळ्यांचा संगम करून पवारसाहेब स्वतःचाच एक सागर निर्माण करतील, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
राजकारणात भावाभावांत विश्वास ठेवता येत नाही. शरद पवार यांचेच बघायचे झाले तर, अजित पवार सत्तेत आहेत आणि शरद पवार विरोधात आहेत. शरद पवार सत्तेसाठी कोल्हापुरात येत आहेत. मी जनतेसाठी कोल्हापुरात येतो. त्यांच्या येण्यात आणि माझ्या येण्यात फरक आहे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार?
राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाही? पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर त्याला फूट कशी म्हणता येईल. पक्षातील एक मोठा गट वेगळा झाला, तर पक्षात फूट पडते. देशपातळीवर अशी स्थिती राष्ट्रवादीत नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.