Bacchu kadu sarkarnama
विदर्भ

Bacchu kadu : '...तर गांजा विकणारालाही तिकीट', बच्चू कडू यांचे खळबळजनक विधान

Bacchu kadu BJP Shaivsena Election : बच्चू कडू म्हणाले, केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये ते 10 आरक्षण वाढवून देऊ शकतात. त्यामुळे मनोज जरांगे यांची मागणी देखील पूर्ण होईल.

Roshan More

Bacchu kadu News : विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपासाठी महायुती, महाविकास आघाडीकडून निकष ठरवण्यात येत आहेत. लोकसभेतील स्ट्राइक रेट आणि निवडून येण्याची क्षमता या दोन निकषावर महायुतीमधील जागा वाटप होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

निवडून येण्याची क्षमते बद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, युती असो नाहीतर आघाडी गांजा विकणारा निवडून येणार असेल तर त्यालाही तिकीट देणार. त्याच्यात काय विशेष. जिता वही सिकंदर आहे. वो कैसा उससे कोई मतलब नाही.

भाजपमुळे एकनाथ शिंदेचे चार खासदार पडल्याचा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. लोकसभेतील सर्व्हेत अमरावतीची जागा भाजप गमवत होता. भाजपच्या निम्म्याहून अधिक पदाधिकाऱ्यांचा नवनीत राणांना विरोध होता.

सर्व्हे राणांचा सीट धोक्यात असताना उमेदवारात बदल का केला नाही? पण सर्व्हेचे कारण देत शिंदेंचे उमेदवार बदलले. ज्याच्या घरचं काम आहे ते त्याला करून द्याना, असा टोलाही कडू यांनी भाजपला लगावला. युतीचा धर्म भाजपाने पाळला असता शिंदे साहेबांच्या चार सीट वाढल्या असत्या असे देखील कडू म्हणाले.

मराठा आरक्षणावर तोडगा काय?

मनोज जरांगे पाटील आज (सोमवार) रात्रीपासून उपोषण सुरू करणार आहेत. मराठा आरक्षणावर तोडका कसा काढायचा यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये ते 10 आरक्षण वाढवून देऊ शकतात. त्यामुळे मनोज जरांगे यांची मागणी देखील पूर्ण होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT