Sadabhau Khot : महाविकास आघाडीतील वळूंना अन्‌ रेड्यांना निवडणुकीत फोडून काढणार; सदाभाऊ कडाडले

Sadabhau Khot on Defeating MVA Leaders : महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार करीत आहेत. हे मराठा समाजाने वेळीच ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर या राज्यात मराठा समाजात दुही माजवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप खोत यांनी केला.
Sanjay Raut-Rohit Pawar-Sadabhau Khot
Sanjay Raut-Rohit Pawar-Sadabhau Khot Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli, 16 September : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे, असे पत्र मनोज जरांगे पाटील आणि सरकारला द्यावे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करावेत. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतील वळूंना आणि रेड्यानं चाबकाने फोडून काढणार आहे, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला.

शिराळा (जि. सांगली) येथील रयत क्रांती कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी सदाभाऊ खोत (Sadabhau Khot ) यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले संजय राऊत नावाचा एक घरकोंबडा दररोज आरोळी देतो.

त्या कोंबड्याला सांगतो. रोज भांग देऊ नकोस खुराड्यातनं..तू एक पत्र लिहून दे मनोज जरांगे पाटलांना, माझी उबाठा शिवसेना मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करायला पाठिंबा देत आहे. अरे बघूया कोंबड्या तुझ्यात जोर आहे का?

महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचे काम शरद पवार (Sharad Pawar) करीत आहेत. हे मराठा समाजाने वेळीच ओळखलं पाहिजे. सगळं दिल्यानंतर या राज्यात मराठा समाजात दुही माजवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप खोत यांनी केला.

Sanjay Raut-Rohit Pawar-Sadabhau Khot
Daund Politics : दौंडला महायुतीत बिघाडी फिक्स; रमेश थोरातांनी पुन्हा दंड थोपटले!

मी अनेकदा आवाहन केलं आहे की, महाविकास आघाडीची जी माणसं निवडून आली आहेत, त्यांनी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहून ‘मी खासदार अमुक...अमुक लिहून देतो की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे..’ असेही सदाभाऊ खोत यानी म्हटले आहे.

रोहित पवार हा विद्वान माणूस आहे, महाराष्ट्रात आग लावत सुटलाय. भाडोत्री सोशल मीडिया महाराष्ट्रात तुम्ही ठेवलाय... तुम्ही लिहून द्या रोहित पवार की, मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला या रोहित पवाराचा पाठिंबा आहे. द्या लिहून हे. महाराष्ट्रात आग लावायचे धंदे बंद करा.. लोकसभेला जमलं म्हणून आता विधानसभेला जमेल ही भावना मनातून काढून टाका, असे आवाहनही सदाभाऊ खोत यांनी केले.

Sanjay Raut-Rohit Pawar-Sadabhau Khot
Georai politics : भाजप आमदाराला राष्ट्रवादीने घेतले फैलावर; ‘पराभवाच्या भीतीने रडू नका...लढून पडा’

महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर अनेक चांगले निर्णय घेतले. अनेक योजना आणल्या. पण, महाविकास आघाडीचे नेते टीका करतात. पण, येणाऱ्या निवडणुकीत या महाविकास आघाडीतील वळूंना आणि रेड्यानं चाबकाने फोडून काढणार आहे, असा इशाराही खोत यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com