bacchu kadu.jpg sarkarnama
विदर्भ

VIDEO Bacchu Kadu : "...तर विधानसभा निवडणूक लढणार नाही", बच्चू कडूंचं मोठं विधान

Bacchu Kadu On Mahayuti : बच्चू कडू हे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे मित्र पक्ष आहेत. त्यातच बच्चू कडूंनी शिंदे सरकारकडे काही मागण्या करत 'टेन्शन' वाढवलं आहे.

Akshay Sabale

विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीनं विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यातच प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

"महायुतीनं ( Mahayuti ) आमच्या मागण्या मान्य केल्या तर विधानसभा निवडणूक लढणार नाही," असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. बच्चू कडू यांनी थेट महायुती सरकारला आव्हान दिल्यानं चर्चेला विधान आलं आहे. तसेच, मी महायुतीत नसल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, "शेतकरी, वंचित, शेतमजूर यांची एक आघाडी तयार करू. आमची पहिली आघाडी राहील. बाकी पक्षांच्या आघाड्या नंतर राहतील. मी महायुतीत आहे, असं कोण म्हटलं? आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत. त्यात शेतकरी, दिव्यागांच्या मागण्या महायुतीनं मंजूर केल्या, तर मी विधानसभा लढणार नाही. माझी जागा महायुतीला देऊन टाकणार."

"पेरणी ते कापणीपर्यंतची कामे 'एमआरएसएस'च्या माध्यमातून झाली पाहिजेत. पन्नास टक्के नफा धरून भाव शेतमालाला जाहीर केला पाहिजे. दिव्यागांना महिन्याला सहा हजार रूपये मिळाले पाहिजेत. शिक्षण आणि आरोग्यात विषमता वाढत चालली आहे. त्यात समानता आणली पाहिजे. तिथे गरीब आणि मजुराचा मुलगा सुद्धा शिकला पाहिजे. यासह 18 मागण्या महायुतीला मागणार आहोत," असं बच्चू कडूंनी सांगितलं.

15 ते 17 जागा लढविण्याचा इशारा...

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मित्र पक्ष असलेल्या बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी करण्याचे संकेत दिले होते. "मी सरकारवर नाराज नाही. पण, जर सरकारनं शेतकऱ्यांबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. तर आम्हाला राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल. तिसऱ्या आघाडीद्वारे आम्ही 15 ते 17 जागा या विधानसबेला लढवू आणि त्या जिंकू देखील. शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत, जे अद्यापही मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे वेळ पडली, तर शेतकऱ्यांसाठी तसा निर्णय घ्यावा लागेल," असं बच्चू कडू म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT