CM Eknath Shinde : '..आणि पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र' ; मुख्यमंत्री शिंदेंचा पंतप्रधान मोदींना शब्द!

CM Eknath Shinde On Opponent : 'झूठ की उम्र बहुत कम होती, सच की जिंदगी लंबी होती. झूठ भले भी झूम लै, जीत तो अखिर सच की होती है', असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

CM Eknath Shinde and PM Modi News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मराठी आणि हिंदीतून भाषण करताना महायुतीतर्फे मोठा शब्द दिला. 'करू अजून मेहनत, करू अजून कष्ट आणि पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र', असा हा शब्द देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली.

लोकसभेला खोटा नरेटिव्ह सेट केला. परंतु 'झूठ की उम्र बहुत कम होती, सच की जिंदगी लंबी होती. झूठ भले भी झूम लै, जीत तो अखिर सच की होती है', अशा शब्दात विरोधकांच्या खोट्या राजकारणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते गोरेगाव-मुलुंड लिंक रोड तिसऱ्या टप्प्यातील सुरुंगचे भूमिपूजन, ठाणे-बोरिवली टनेल भूमिपूजन, कल्याण यार्ड रि-मॉडलिंक, गतिशक्ती मल्टीमोटर कार्गो, लोकमान्य टर्मिनल्समध्ये नवीन प्लॅटफॉर्म, सीएसएनटीमधील दोन प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि मुख्यमंत्री कार्य कौशल योजनेचा प्रारंभ झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांचे फेटा बांधून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती देऊन स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री रामदास आठवले, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

CM Eknath Shinde
PM Modi News : ''महाराष्ट्राला 'Financial Power House' अन् मुंबईला 'Think Tank Capital' बनवणं माझं उद्दिष्ट'' ; मोदींचं विधान!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी त्यांच्या भाषणात चौफेर टोलेबाजी केली. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा जिंकले आणि विरोधक हरले, तरी पेढे वाटत होते. मोदी यांची पंतप्रधान पदावर हॅट्रीक झाली. विरोधकांनी शंभर जागा देखील जिंकल्या नाही, तरी पेढे वाटत सुटले. पण जनता विकासाबरोबर आहे. मोदी यांच्या मन-तन आणि कामात प्रभू श्रीराम असून, त्यांच्याबरोबर डाॅ. बाबासाहेब आंबडेकर यांचे संविधान आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींची स्तुती -

पंतप्रधान मोदी यांची स्तुती करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'एनर्जी, स्पीड, डेडिकेट्शन, कमिटमेंट याचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे मोदी. महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प सुरू आहेत, ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंबामुळे. नरेंद्र मोदी यांच्या हाताला यशाचा परीस लागला आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई मेट्रो किंवा निळवंडे धरण असो, अशा कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पण मोदींनीच करतात. ठाणे-बोरवली दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत पूर्ण होतील. भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मोदी यांच्या हस्ते होईल.'

CM Eknath Shinde
Narendra Modi In Mumbai : लोकसभेत भोवलेल्या विरोधकांच्या 'त्या' दाव्यातली मोदींनी हवाच काढली! थेट RBI चे आकडेच सांगितले

राज्यात आनंदाचे वातावरण -

मुख्यमंत्री यांनी यावेळेस विविध योजनांची माहिती दिली. राज्यात अतिशय आनंदाचा वातावरण आहे. यामुळे विरोधकांना प्रश्न पडलाय, त्यांचे चेहरे पडले आहेत. हे सरकार बोलते तेच करते आहे आणि जे होईल तेच करत आहे. राज्य सरकारला मोदी सरकारचा भक्कम पाठिंबा मिळतो. आम्ही जे प्रस्ताव केंद्राकडे पाठवत आहोत ते प्रस्ताव कोणत्याही एका पैशाचा कट न लावता केंद्र सरकारकडून जसेच्या तसे मंजूर होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई जगातले सुंदर शहर करणार -

मुंबई हे जगातले सुंदर आणि उत्कृष्ट शहर व्हावं हे स्वप्न साकार करत आहोत. महालक्ष्मी रेस कोर्स, या रेस कोर्सवर 300 एकर वर्ल्ड क्लास पार्क सेंटर पार्क उभा करत आहोत. हे मुंबईकरांसाठी मोठे आहे. मुंबईत रखडलेले पुनर्विकास प्रकल्प राबवतोय. अटल सेतू आणि कोस्टल रोडने मुंबईच्या भागाला मेक ओव्हर केलेला आहे. मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

CM Eknath Shinde
Devendra Fadnavis News : 'या' अभूतपूर्व प्रकल्पांसाठी पीएम मोदींचं नाव इतिहासात लिहिलं जाईल; फडणवीसांचं मोठं विधान

स्पीड ब्रेकर हटवले -

गेल्या सरकारने मुंबईच्या विकासासाठी स्पीड ब्रेकर टाकले होते. ते आम्ही काढून टाकले. आता मुंबईच्या विकासाला नवा स्पीड आलेला आहे. सुरक्षित, सुशोभीत आणि विकासित मुंबई घडवत आहोत. यासाठी मोदींची साथ आपल्याला हवी आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्याचा चेहरामोहरा बदलला. पुढील पाच वर्षात देखील आपल्याला मोदींची साथ मिळणार आहे. करू अजून मेहनत करू अजून कष्ट पुन्हा जिंकून दाखवू विधानसभेत महाराष्ट्र, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com