raju shetty | bachhu kadu | sambhajiraje chhatrapati.jpg sarkarnama
विदर्भ

Assembly Election 2024 : तिसऱ्या आघाडीला सत्ताधारी-विरोधकांमधील ‘बिघाडी’ची प्रतीक्षा

Mahashakti Parivartan Aghadi : तिसऱ्या आघाडीनं राज्यात सुमारे शंभर जागा लढवण्याचे ठरवले असले तरी अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

Rajesh Charpe

विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले राजकीय अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली आहे. यात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि स्वराज्य पक्षाचे प्रमुख, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा समावेश आहे. आघाडीने राज्यात सुमारे शंभर जागा लढवण्याचे ठरवले असले तरी अद्याप एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बिघाडीवरच तिसऱ्या आघाडीचे उमेदवार ठरवण्यात येणार आहेत.

आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांना उमेदवारांच्या यादीबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, “शंभर उमेदवारांची यादी आमची तयार आहे. आम्ही कोणाला भीत नाहीत. आजही ती जाहीर करू शकतो. मात्र आघाडी आणि युतीमधील बिघाडीवर आम्ही लक्ष ठेवून आहे.”

हे बघता महाविकास आघाडी आणि युतीमधील नाराजांना तिसरी आघाडी प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट दिसून येते.

“राज्यात कितीही मोठे नेते असले, तरी आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला कोणाची भीती नाही. विदर्भात रामटेक, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, आर्वी यासह अजून तीन-चार महत्त्वाच्या जागा आहेत. येथे सक्षम उमेदवार आम्ही शोधत आहोत,” असं बच्चू कडूंनी सांगितलं.  

अचलपूरमध्ये प्रहार संघटनेच्या बळावर सातत्याने निवडून येत असल्याने भाजप आणि काँग्रेसला ते खटकत असल्याचे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. भाजपने कडू यांच्याविरोधात प्रवीण तायडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

“केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना नव्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन भाजपने आधीच हार पत्करली आहे. काँग्रेसला जिंकवण्यासाठी आपल्या विरोधात कमजोर उमेदवार दिला,” असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

“एकीकडे काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायला भाजप निघाली आहे. मात्र, अचलपूरमध्ये काँग्रेसयुक्त भाजप, असे धोरण स्वीकारले आहे. भाजप आता आपल्याच कार्यकर्त्याला बकरा बनवत अशी परिस्थिती आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर भगवा ठेऊन पंजाला विजयी करण्याचे प्रयत्न अचलपूरमध्ये सुरू आहे. दुसरीकडे अमरावती जिल्ह्यात भाजपला शिल्लकच ठेवायचे नाही, अशी व्यवस्था आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा यांनी केली,” असा आरोपही कडूंनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT