Bacchu Kadu : शिंदेंनी आमदार फोडला, आता बच्चू कडूंना घेरण्यासाठी भाजपनं कट्टर विरोधकाच्या माध्यमातून लावली ‘फिल्डिंग’?

Mahashakti News : बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत महायुतीत होते. मात्र, कडू यांनी संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्यासोबत जात ‘महाशक्ती’च्या माध्यमातून तिसरी चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपकडून कडूंना घेरण्याचं काम केलं जात आहे.
eknath shinde  Bacchu Kadu  devendra fadnavis
eknath shinde Bacchu Kadu devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेनेतील फुटीनंतर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना ‘सपोर्ट’ करत महायुतीत प्रवेश केला. मात्र, लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार उभा केल्यानं त्यांचं महायुतीसोबत फिस्कटलं. तसेच, लोकसभेला नवनीत राणा यांचा पराभव झाला. तेव्हापासून कडू आणि राणा दाम्पत्यामधील विस्तव जाता-जात नाही. त्यामुळे बच्चू कडू यांना घेरण्यासाठी भाजपकडून ‘फिल्डिंग’ लावल्याचं बोललं जात आहे.

महायुतीत घटक पक्ष असताना बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनी नवनीत राणा यांना तिकीट देण्यास विरोध केला होता. मात्र, तरीही भाजपनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं कडू संतापले आणि दिनेश बूब यांच्यामाध्यमातून अमरावती मतदारसंघात उमेदवार उभा केला. दिनेश बूब यांनी या निवडणुकीत 76 हजार मते घेतली. मात्र, नवनीत राणा यांना 20 हजार मतांनी बळवंत वानखेडे यांनी पराभूत केलं.

दिनेश बूब यांच्यामुळे मतांची फुटाफूट झाल्यानं नवनीत राणा  ( Navneet Rana ) यांचा पराभव झाला. ही सल अजूनही राणा दाम्पत्याच्या मनात आहे. यानंतर राणा दाम्पत्यानं बच्चू कडू यांच्यावर ‘सुपारीबाज’, ‘ब्लॅकमेलर’, ‘ढोंगी’, ‘नाटकीबाज’ असा हल्लाबोल केला होता. कडू आणि राणा दाम्पत्यामधील हे शाब्दिक ‘वॉर’ सुरूच आहे.

eknath shinde  Bacchu Kadu  devendra fadnavis
Bacchu Kadu : नवनीत राणांचा पराभव कुणामुळे झाला अन् रवी राणा कुणामुळे पडणार? बच्चू कडूंनी सांगितलं; शेरोशायरीतून केलं घायाळ

यातच लोकसभेतील पराभवानंतर नवनीत राणा बच्चू कडू यांच्या दर्यापूर आणि अचलपूर सक्रिय झाल्या आहेत. एकीकडे बच्चू कडू यांचा एक आमदार शिंदेंच्या शिवसेनेनं फोडला आहे. त्यातच बच्चू कडू यांना घेरण्यासाठी भाजपकडून नवनीत राणा यांना दर्यापूर आणि अचलपूर मतदारसंघातून उतरवण्याची शक्यता आहे.

eknath shinde  Bacchu Kadu  devendra fadnavis
VIDEO : बालेकिल्ल्यात जाऊन बच्चूभाऊंवर नवनीत राणांचे 'कडू'वार; बरंच काही बोलून गेल्या...

चारवेळा दर्यापूर अन् अचलपूरमधून विजय...

माजी राज्यमंत्री स्वर्गीय विनायक कोरडे यांचे चिरंजीव प्रमोद कोरडे यांनी अचलपूरमधून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. मात्र, त्यांना राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष केलं आहे. त्यामुळे प्रमोद कोरडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. बच्चू कडू हे अचलपूरमधून सलग चारवेळा निवडून आले आहेत. यंदा त्यांनी ‘महाशक्ती’च्या माध्यमातून वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुती आणि महाविकास आघाडीला कशी टक्कर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com