Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu: अध्यक्षपद संपायला 4 दिवस बाकी अन् मोठा ट्विस्ट! बच्चू कडूंना दिलासा; चौकशीला कोर्टाची स्थगिती

Amravati District Bank Inquiry Supreme Court Stay: अमरावती जिल्हा बँक चौकशीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. बच्चू कडूंच्या अध्यक्षपदाची मुदत चार दिवसांत संपणार असताना हा निर्णय आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे तसेच चौकशीमध्ये तथ्य आढळून आल्यास एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून या आदेशाला स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार ऑक्टोबरला बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण होत असून त्यानंतर प्रशासकराज सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार बच्चू कडू हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष तसेच सहकारातील नेते अभिजित ढेपे हे उपाध्यक्ष आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बोलताना ढेपे म्हणाले, विरोधी संचालकांनी न्यायालयाची दिशाभूल केली आहे. ही बाब आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिली, तरीसुद्धा कुठल्याही चौकशीस आम्ही तयार आहोत. चौकशीसाठी बँकेतर्फे संपूर्ण कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबतच्या तक्रारी बँकेचे संचालक बाबूजी गायगोले, बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, वीरेंद्र जगताप, सुरेश साबळे, श्रीकांत गावंडे तसेच काही सभासदांनी सुरवातीला जिल्हा उपनिबंधकांकडे केल्या होत्या. त्यानंतर नाबार्डमार्फत बँकेच्या व्यवहारांची चौकशी करण्यात आली. मात्र हे प्रकरण मॅनेज करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. त्यामुळे आम्ही न्यायालयात दाद मागितल्याचे त्यांनी सांगितले.

२०२५ मध्ये याबाबत विरोधी संचालकांनी बॅंकेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याबाबतची तक्रार न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिल्याने सहकारच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र या निर्णयाविपरोधात सत्ताधाऱ्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने उच्च न्यायालयाचया आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती बॅंकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी दिली आहे.

प्रशासक की मुदतवाढ? अनिश्चितता कायम

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ चार ऑक्टोबरला संपत आहे. विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता धूसर असून बॅंकेचे कामकाज आता प्रशासकांमार्फतच चालविण्याचे संकेत सहकार विभागाकडून मिळत आहेत. अद्यापही निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी सत्ताधारी व विरोधी गटांकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आतापासूनच जिल्हा बॅंकेतील राजकारण तापू लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT