Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu : बच्चू कडू यांच्या जिवाला धोका; निनावी फोनवरून 'आज मौका देख के...'

Pradeep Pendhare

Bachchu Kadu On Amravati Police : माजी मंत्री बच्चू कडू यांना गेल्या काही दिवसांपासून निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही विचारले जात आहे. या निनावी फोनवरून बच्चू कडू यांना वेगळाच संशय आला असून यावरून त्यांनी अमरावती पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

आपल्या जिवाला धोका असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. बच्चू कडू यांच्या या तक्रारीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकारांची चौकशी करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात धमकीचा उल्लेख केला आहे. धमकी देणाऱ्याने "शिंदे (Eknath Shinde) साहेबांचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. गडचिरोलीतील असून नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी दिघेंना संपवले, तसे बच्चू कडूला पाहून घेऊ. शिंदे साहेब, बच्चू कडूला संपवणार नाही तर, मी स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही. पाहू घेऊ", अशा धमक्या येत असल्याचे बच्च कडू यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 'आज मौका देख के, बच्चू कडू को चौका मारेंगे', असे देखील धमक्यांचे स्वरुप आहे.

बच्चू कडू यांनी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस (Police) अधीक्षकांना याबाबत पत्र लिहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असे धमकीचे निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत ठिक आहे का?

या निनावी फोन करणाऱ्यांना जाब विचारल्यावर फोन बंद होत आहेत. अशा फोनची चौकशी केल्यावर अशा प्रकारचे फोन येणे म्हणजे धमक्या आहेत, असा संशय बच्चू कडू यांना आला. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देखील केली आहे.

पोलिसांना लिहिलेल्या पत्रात बच्चू कडू यांनी गोपनीय माहितीनुसार जिवीताला धोका असल्याचे म्हटले आहे. असे माझ्या अपघाताचे निनावी फोन नागरिकांना देखील येत आहेत. यातून अफवा पसरवली जात असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. बच्चू कडू यांनी पोलिस अधीक्षकांना अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

बच्चू कडू प्रहार संघटनेचे प्रमुख आहे. माजी मंत्री असलेल्या बच्च कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे. बच्चू कडू यांच्या जिवीताला धोका असल्याच्या वृत्ताने अमरावतीसह राज्यात खळबळ उडाली आहे. अमरावतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चा या धमक्यांवरून घडू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT