Laxman Hake And Government Delegation : मोठी घडामोड; लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, आंदोलनस्थळी गोंधळ आणि घोषणाबाजी

Confusion of OBC Workers During Discussion of Laxman Hake and Government Delegation : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी ओबीसी आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. सरकारने ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट मांडावी, अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.
Laxman Hake And Government Delegation
Laxman Hake And Government DelegationSarkarnama
Published on
Updated on

OBC Protest News : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर आणि अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. लक्ष्मण हाके आणि शिष्टमंडळासमोर यांच्यात चर्चा सुरू असताना आंदोलनस्थळी असलेले कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे गोंधळ उडाला.

जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलक शिष्टमंडळासमोर ज्या मागण्या मांडत होते, तसा समोरील कार्यकर्ते 'एकच गर्व, ओबीसी सर्व', अशी घोषणाबाजी करत होते. दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचे सांगितले.

लक्ष्मण हाके आणि शिष्टमंडळांमध्ये सुरूवातीला प्राथमिक चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळातील उदय सामंत आणि गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी सुरवातीला चर्चा केली.

गिरीश महाजन यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. चर्चेसाठी हाकेंनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील, असे आश्वासन दिले. लक्ष्मण हाके यांनी यावर ओबीसी आणि सगेसोयरे याची भूमिका स्पष्ट करावी.

सरकारने काय खरे ते सांगावं. मनोज जरांगे म्हणतात की, आम्ही ओबीसीमध्ये आलो. कोण खरं बोलत आहे, मनोज जरांगे की, सरकार हे स्पष्ट करावे, अशी मागणी केली.

Laxman Hake And Government Delegation
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला सरकार 'फेस' करणार; लेखी आश्वासन देणार?

आम्हाला सावत्र वागणूक दिली जात आहे. कुणबी नोंदी वाटपाचे काम थांबवावे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवला जात आहे. सरकार याकडे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केली.

ओबीसी आरक्षणाला (Reservation) धक्का लागणार नाही, असे लेखी द्या, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी यानंतर घेतली. यानंतर आंदोलनस्थळी असलेल्या कार्यकर्ते आक्रमक झाले. जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

चर्चा निष्फळ होत असल्याचे लक्षात येताच गिरीश महाजन यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून संपर्क केला. देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा केली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी लेखी मागणी आंदोलकांनी केली.

Laxman Hake And Government Delegation
Video Laxman Hake : वडेट्टीवार गहिवरले अन् थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला; हाकेंनी मात्र चर्चेला नकार दिला..

पाठिंब्यासाठी 200 वाहनांचा ताफा जालन्याकडे रवाना

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करण्यात आली. लक्ष्मण हाके यावेळी देखील लेखी आश्वासनावर ठाम राहिले. मुंबईला शिष्टमंडळाबरोबर चर्चा करू, असे आश्वासन दिले. लक्ष्मण हाके यांनी ओबीसी संदर्भात केलेल्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलवली आहे.

तोपर्यंत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या आंदोलक सहकारी यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे. नांदेडमधील 200 वाहनांचा ताफा ओबीसी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झाला आहे. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसी आंदोलनाची तीव्रता वाढणार असल्याचे दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com