Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu : 'मी 'खोके' घेतले का? शिंदे-फडणविसांनीच स्पष्ट करावे!'

Bachchu Kadu : कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप, रवी राणा यांनी केला होता

सरकारनामा ब्यूरो

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्यात रंगलेला वाद विकोपाला गेला आहे. कडू आणि राणांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद - विवाद घडत होते. कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप, रवी राणा यांनी केला होता. यावर पलटवार करताना बच्चू क़डू आक्रमक होत, मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी जाहीर करावं, असे आव्हान कडू यांनी दिले.

गुहाहाटीला जाऊन कोट्यावधी रूपये बच्चू कडूंनी लाटले. इतकंच नाही तर बच्चू कडू यांनी विधान परिषद आणि राज्यसभेसाठी पैसे घेतल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. या आरोपानंतर बच्चू कडू अत्यंत आक्रमक झाले असून, राणांवर बरसून टीका केली आहे. त्यांनी आरोप केले आहेत तर त्यांनी पुरावे द्यावेत, असे कडू म्हणाले.

हा काही लहान विषय नाही. आम्ही गुवाहाटीला रवाना झालो होतो म्हणून सांगता, दुसरीकडे हे राणाच स्वतः मंत्रिपदासाठी रांगेत उभे राहण्यात पुढे आहेत, आता आरपारची लढाई आहे. लढायला मी तयार आहे, मी जर खोके घेतले असेन तर त्याचे पुरावे देण्यात यावे. मी खोके घेतले का? हे शिंदे-फडणविसांनी सांगावे, असे आव्हानही बच्चू कडू यांनी दिले.

यामुळे आता हा वाद मुख्यमंत्री आणि फडणविसांच्या कोर्टात पोहचले आहे. शिंदे - फडणवीस सरकारवर खोके सरकार म्हणून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येते. आता दोन भाजप समर्थक आमदारांकडूनच खोक्यांचे आरोप झाल्यामुळे शिंदे - फडणवीस सरकार खोक्यांचा व्यवहार करून आले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, 'राणांनी आता लढायला तयार राहावं. जिथे म्हणाल, तिथे मी एकटा यायला तयार आहे, असेही बच्चू कडू यांनी राणांना इशारा दिला. राणांनी आपल्यावर तोडपाणीचे आरोप केलेत, या आरोपाचे एक तारखेपर्यंत पुरावे मला द्या. पुरावे दिले तर मी राणांच्या घरी भांडी घासीन, असेही बच्चू कडू म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT