Pune Police : आधी पोलिसांना खांद्यावर घेतले; नंतर दंडुक्याचा प्रसाद मिळाला !

पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या बेशिस्त तरूणांना पुण्यात पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला.
Pune Police
Pune Police Sarkarnama

Pune Police : पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या बेशिस्त तरूणांना पुण्यात पोलिसांच्या (Pune Police) दंडुक्याचा प्रसाद मिळाला. मेलबोर्न शहरात भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होता. या सामन्यात भारताने विजय मिळविल्यानंतर पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर येत तरूणांनी विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, वेळेचे आणि वाहतूक कोंडीचे भान नसलेल्या तरूणांनी रस्त्यावर धिंगाणा घातला. पोलिसांनी सांगूनही न ऐकणाऱ्या तरूणांवर पोलिसांनी शेवटी लाठीमार करीत त्यांना दूर करून वाहतूक सुरळित केली.

गेल्या महिनाभरापासून पुण्यात वाहतुकीची समस्या अधिकच जाणवू लागली आहे. त्यातच दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचे हाल होत आहेत. या परिस्थितीत वाहतुकीची कोणतीही फिकीर न करता बराच वेळ रस्ता अडवून आनंद साजरा करणाऱ्या युवकांना आधी रस्त्यातून दूर होण्यास पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांच्या विनंतीनंतरदेखील तरूण रस्त्यात उभे राहून वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर उद्दामपणा करणाऱ्या तरूणांवर पोलिसांनी लाठीमार केला.

Pune Police
फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराच्या आरोपानंतर खोक्यांचे राजकारण पुन्हा पेटले

विजयाने भारावून गेलेल्या तरूणांनी आनंदाच्या भरात ड्यूटीवर असलेल्या पोलिसाला खांद्यावर घेतले. नाचून आनंद साजरा केला. या साऱ्या प्रकाराने संपूर्ण डेक्कन परिसर वाहतुकीत अडकला. तरूणांचा आनंदात पाहून पोलिसांनी काही वेळ दिला. मात्र, काही वेळेनंतर पोलिसांनी रस्त्यातून बाजूला होत रस्ता वाहतुकीला खुला करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेवटी पोलिसांनी लाठीमार केला.

Pune Police
Shirur News : वाबळेवाडी शाळा प्रकरणात झेडपी सीईओ यांना दणका!

गेल्या महिनाभरापासून पुण्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या काळात यात भर पडली. यावर उपाय म्हणून दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यासह पुणे पोलिसांनी इतर उपाययोजना केल्या. तरीही वाहतुकीचा प्रश्‍न संपलेला नाही. त्यातच आजच्या भारताच्या विजयानंतर आनंदाच्या भरात तरूणांच्या तरूणांनी घातलेला गोंधळ वाहतुकीला अठचणीची ठरली. पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरूणांना शेवटी पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसास खावा लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com