Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu : कर्जमाफीवर बच्चू कडू ठाम! मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना, हायहोल्टेज बैठकीत काय होणार?

Bachchu Kadu Meeting with CM : मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात, कडू यांची समजूत ते कशी काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक सायंकाळी सात वाजता होणार आहे. एकूण ४२ जणांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे.

Rajesh Charpe

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दोन दिवस नागपूरच्या रस्तावर ठाण मांडून बसलेले बच्चू कडू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी विमानाने मुंबईला रवाना झाले आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, आजच सरकारने कर्जमाफीची घोषणा करावी अशी त्यांची मागणी आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात, कडू यांची समजूत ते कशी काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही बैठक सायंकाळी सात वाजता होणार आहे. एकूण ४२ जणांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे.

बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि सरकारसोबतच चर्चा करावी यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन त्यांच्याकडे आले होते. कडू यांनी सर्वांसोबत विचारविनिमय करून चर्चेला येण्याची तयारी दर्शवली. मात्र सोबतच आंदोलन सुरूच राहील असेही स्पष्ट केले. फक्त वाहतुकीची कोंडी होणार नाही याचा शब्द त्यांनी शिष्टमंडळाला दिला. कर्जमाफीची घोषणा सरकारने केली नाही तर उद्या रेल्वे रोखो आंदोलनाला सुरुवात केली जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.

तत्पूर्वी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ सरकाराला द्यावा अशी विनंती केली आहे. मात्र आंदोलकांनी ती फेटाळून लावली आहे. उद्या आचारसंहिता आहे, पुढे काही आणखी वेगवेगळी कारणे पुढे केली जातील आणि वेळ मारून नेली जाईल याची शंका व्यक्त करण्यात आली. सरकार हजार भानगडी करतील त्यामुळे आता यापुढे कर्जमाफीसाठी अधिक वेळ दिला जाणार नाही. यापूर्वी वेळ दिला होता. समिती स्थापन केली होती. समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर सरकारने काहीच केले नाही. आता पुन्हा तीच खेळी केली जाण्याची शक्यता आहे. हे बघता सरकारने आजच कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी केली आहे. बच्चू कडू यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची सायंकाळी सात वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT