

Bacchu Kadu Farmers Protest : शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या आंदोलनावर लवकारात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेचं आमंत्रण दिलं होतं. सरकारच्या या विनंतीला मान देत बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांचं एक शिष्टमंडळ आज (ता.30) सरकारमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहे.
मात्र, या बैठकीला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी नेमकी कर्जमाफी कोणाला द्यावी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, जे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांची सरकारी नोकरी आहे, पेन्शन आहे किंवा जे व्यापारी आहेत आणि ज्यांनी केवळ टॅक्स वाचवण्यासाठी शेती घेतली आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये, असं ते म्हणाले.
शिवाय डिजिटल इंडियामुळे प्रत्येकाची खरी आर्थिक स्थिती शोधणे सरकारला सोपे असल्यामुळे सरकारने गरजवंत शेतकरी लवकरात लवकर शोधून कर्जमाफी करावी, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर काही गोष्टी चांगल्यासाठीच तर काही वाईटासाठी घडत असतात.
कोणी कितीही उलटे डाव टाकले तरी आमचं आंदोलन प्रामाणिक आहे. त्यामुळे आम्हाला निसर्गाने आणि जनतेने देखील साथ दिली. कारण आम्ही रस्त्यावरउतरून आंदोलन करत होतो तेव्हा आम्हाला निसर्गाची साथ मिळाली आणि जागा बदलल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे देवही आमच्या बाजूने आहे. आमचं आंदोलन प्रामाणिक असून सरकार कसंही वागलं तरी शेतकऱ्याची गरज महत्त्वाची असल्याचं कडू म्हणाले.
दरम्यान, आमच्या मागण्या आम्ही आज सरकारसमोर मांडणार आहोत. त्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनस्थळी येऊ आणि पुढची दिशा जाहीर करू, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला. तर शेतकरी स्वखर्चाने या आंदोलनासाठी येत आहेत. सगळ्या जातीचे लोक या आंदोलनात सहभागी झालेत हेच आमच्या आंदोलनाचं यश शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.