BJP MLC Parinay Fuke criticizes Bachhu Kadu protest Sarkarnama
विदर्भ

Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी स्टंटबाजी बंद करावी : कर्जमाफी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदाराचा सल्ला

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Rajesh Charpe

नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारपासून (28 ऑक्टोबर) त्यांनी नागपूरमधून शेतकऱ्यांच्या महाएल्गार आंदोलनाची सुरुवात केली आहे. यावर भाजप आमदार परिणय फुके यांनी बच्चू कडू यांनी स्टंटबाजी बंद करावी असा सल्ला दिला. त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी बावनकुळे यांनीही कडू यांच्या आंदोलनाला नौटंकी असे संबोधले होते.

आमदार फुके म्हणाले, बच्चू कडू सत्तेत आणि विरोधात राहिले आहेत. त्यांना मंत्रिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव आहे. असे असताना काहीतरी स्टंटबाजी करणे आणि लोकांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे आमदार फुके म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे.

महायुतीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सरकारने जी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली जातील असे सांगितले आहे. यात कर्जमाफीचाही समावेश आहे. सरकारचा जाहीरनामा पाच वर्षांच असतो. महायुती सरकाराचा अद्याप वर्षभराचा कार्यकाळ देखील पूर्ण व्हायचा असल्याचे फुके म्हणाले. बोलण्यात फटकळ असलेले कडू आता काय प्रत्त्युतर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बच्चू कडू पुन्हा आंदोलकाच्या भूमिकेत आले आहेत. त्यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी कर्जमाफीसाठी उपोषण सुरू केले होते. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईनंतर उपोषण मागे घेतले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मात्र कडू यांनी पावसाळी अधिवेशनातच घोषणा करावी अशी मागणी केली होती.

यावर बावनकुळे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये कडू यांना सहभागी करून घेतले होते, कशा प्रकारे कर्जमाफी दिली जाणार आहे याची माहिती असतानाही सरकारवर ते सार्वजनिकरित्या बेछूट आरोप करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले आहे. यावर कडू यांनी हीच कर्जमाफीची योग्य वेळ असल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT