Pankaj Bhoyar On Parbhani : फडणवीसांवर गंभीर आरोप, गृहराज्यमंत्री भोयर यांचा गांधींवर पलटवार; म्हणाले, 'काही संघटना महाराष्ट्र अस्थिर...'

Minister of State for Home Pankaj Bhoyer Wardha LokSabha Opposition Leader Rahul Gandhi CM Devendra Fadnavis Parbhani Somnath Suryavanshi death case : परभणीत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताच गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी पलटवार केला.
Pankaj Bhoyar
Pankaj BhoyarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी इथं मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले.

यावरून आता महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनात, महायुतीचे नेते समोर येऊ लागलेत. राहुल गांधी यांच्या आरोपांवर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काही संघटनांना महाराष्ट्रात स्थिर नको आहे, असा गंभीर आरोप करत पलटवार केला.

पंकज भोयर यांनी वर्धा इथं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूविषयी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थनात पुढं येत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गंभीर आरोप करत पलटवार केला.

Pankaj Bhoyar
Santosh Deshmukh Murder Case : 'संतोषवर वार करणाऱ्यांना फाशीच्या तख्तापर्यंत सरकार नेणार'; मंत्री संजय शिरसाट म्हणाले, 'बीड खतरनाक...'

पंकज भोयर म्हणाले, "विरोधक परभणी घटनेत राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात अशा काही संघटना आहे की, त्यांना महाराष्ट्र स्थिर नको आहे. इथं काही घडलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीचे प्रयत्न त्यांच्यामार्फत सुरू असतात. परंतु महाराष्ट्रातली जनता समजदार असून अशा खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही". सामान्य लोकांसह नेत्यांनीही अशापद्धतीचे वातावरण निर्माण न करता चांगल्या पद्धतीचे वातावरण, कसे राहील याचा प्रयत्न करावा, असेही पंकज भोयर यांनी म्हटले.

Pankaj Bhoyar
Top 10 News : पूजा खेडकरला हायकोर्टाचा दणका ; कोल्हापुरात मोठी राजकीय घडामोड; नितीन गडकरींनी का मागितली माफी?- वाचा महत्त्वाच्या घडामोडी

परभणी प्रकरणात सभागृहात मुख्यमंत्री यांनी चुकीची माहिती दिली, अशी मांडणी राहुल गांधी यांनी करणं चुकीचं आहे. कारण तो पटलावर येत असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय सत्य माहिती सभागृहला दिली. ही पोलिस कोठडीतील हत्या नसून, शवविच्छेदनाचा अहवाल पाहिला तर त्यांना श्वासाचा आजार होता, याकडे पंकज भोयर यांनी लक्ष वेधले.

न्यायाधीशांसमोर सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठल्याही प्रकारची मारहाण पोलिसांकडून झाली नाही, असे सांगितले आहे. जेव्हा पोलिस कोठाडीतून न्यायालयनीन कोठाडीत त्यांना पाठविण्यात आला तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे, या बारीक मुद्याकडे भोयर यांनी लक्ष वेधले.

काँग्रेस संविधान सन्मान सप्ताह आयोजित करत आहे. यावर बोलताना गृहाराज्यमंत्री भोयर यांनी देशभरात संविधानाचा खरा सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू आहे. जितका सन्मान भाजपच्या कार्यकाळात दलित समाजाला देण्यात आला, जी कामं करण्यात आली ते इतिहासात कधीही करण्यात आली नाहीत, असेही सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com