<div class="paragraphs"><p>Bacchu Kadu</p></div>

Bacchu Kadu

 

Sarkarnama

विदर्भ

बच्चू कडू म्हणाले, औकात नसताना अशी तुलना करू नये…

Abhijeet Ghormare

भंडारा : भारतीय जनता पक्षाचे लोक मोदींची तुलना कधी प्रभू श्रीरामचंद्रांसोबत करतात, तर कधी शिवाजी महाराजांसोबत (Shivaji Maharaj) करतात. पण औकात नसताना अशी तुलना करून ते कधीच मोठे होणार नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी दिली.

भंडारा जिल्हा दौऱ्यावर आले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपवाल्यांची लायकी काय आहे, हे त्यांनी विसरू नये. शिवाजी महाराज कुठे अन् हे कुठे, अशी तुलना करणे म्हणजे त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. यापुढे त्यांनी आपली लायकी बघून वागावे, बोलावे, असा सल्लाही मंत्री कडू यांनी दिला.

बहुसंख्य ओबीसी समाजाला डावलून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणे अन्यायकारक आहे. ते आज भंडारात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक न घेण्याचा ठराव राज्य सरकारने मांडलेला आहे तो योग्य असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. आमचा त्याला पाठिंबा असल्याचे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. आजच्या न्यायालयाच्या कार्यवाहीनंतर काय ते निश्‍चित सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या तुटून पडले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा भरली असून सत्तेचा माज आला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मिळाल्यावर त्यांना आता त्यांचे नेते मोठे वाटतात आणि छत्रपती लहान वाटू लागले आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदुत्व व त्यांची शान-बान वाढवली व आपल्या कर्तृत्वाने जगाला संदेश दिला.

भाजपने सत्तेसाठी त्या हिंदुत्वाला हिंदूवादी बनवून सत्तेसाठी काहीपण करा कुणाचाही जीव घ्या. देशात कृत्रिम महागाई निर्माण केली व गरिबाला, बेरोजगाराला व शेतकऱ्याला संपवले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिंदू वोट बॅंक बनवली होती. त्याला कळस हा नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी चढवला. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील अनेक नेत्यांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT