बच्चू कडू अधिकाऱ्यांवर गरजले, म्हणाले...

महाराष्ट्राचे ( Maharashtra ) कामगार राज्यमंत्री बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी सनफार्मा कंपनीला भेट दिली.
Bachchu Kadu while instructing the officers
Bachchu Kadu while instructing the officersSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर : अहमदनगर शहरातील जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेला महिना पूर्ण होताच शहरातील एमआयडीसीत असलेल्या सनफार्मा कंपनीतील केमिकलला काल ( बुधवारी ) रात्री 10 वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी काल रात्री ( गुरुवारी ) सव्वा दहा वाजता महाराष्ट्राचे ( Maharashtra ) कामगार राज्यमंत्री बच्चू कडू ( Bachchu Kadu ) यांनी सनफार्मा कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस व कंपनी प्रशासनाला सूचना दिल्या. Bachchu Kadu got angry with the officials and said ...

सनफार्मा कंपनीतील लोडिंग-अनलोडिंग यार्डमध्ये बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास केमिकल सॉलवंटला आग लागली. आग लागल्याचे समजताच कंपनीच्या व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी तात्काळ एमआयडीसी अग्निशमन विभाग व महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन विभागाचे 2 व महापालिका अग्निशमन विभागाचे 2 असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला होता. कंपनीत मागील सात वर्षांत तीन वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कंपनीतील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Bachchu Kadu while instructing the officers
बच्चू कडू मध्यरात्री वाबळेवाडी शाळेत ; म्हणाले, मी तुमच्यासोबत, लवकरच सुनावणी होणार

काल राज्य मंत्री बच्चू कडू यांनी सन फार्मा कंपनी मध्ये घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की या घटनेला ज्या कोणी यंत्रणा दोषी असेल त्या सर्वांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश त्यांनी एमआयडीसी प्राधिकरण अधिकारी स्वप्नील देशमुख यांना दिले आहेत. तसेच या पुढील काळात अशा घटना घडू नयेत म्हणून कंपनीला सक्त ताकीद द्यावी. आग प्रतिबंध करण्यासाठी जेवढ्या यंत्रणा आहेत त्या बसवण्याचा उपाययोजना कराव्यात.

सनफार्मा कंपनीतील आगीत एकाचा मृत्यू झाला मात्र मृत्यूची नोंद पोलिसांनी केलेली नाही. या संदर्भात बच्चू कडू म्हणाले, या आगीतील घटनेमध्ये कंपनीचे कर्मचारी रावसाहेब मघाडे यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करून उद्याच्या उद्या गुन्हे दाखल करावेत असेही त्यांनी सांगितले आहे

Bachchu Kadu while instructing the officers
अहमदनगर एमआयडीसीतील सनफार्मा कंपनीत आग

चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा वेळकाढूपणा झाला नाही तरच त्या मृत अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल नाही तर शासकीय रुग्णालयातील आगी प्रकरणी सात दिवसाची चौकशी महिन्यावर झाली तरी चालूच असल्यामुळे हा चौकशीचा फार्स पुन्हा होऊ नये, असे बच्चू कडू असे सांगितले. बच्चू कडू यांनी सूचना देऊनही अजूनही मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Bachchu Kadu while instructing the officers
नगर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे तीन-तेरा

एमआयडीसीतील आगीच्या घटनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली इंडस्ट्रिअल कमिटी असते. या कमिटीला अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- डॉ. विरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अहमदनगर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com