Bachchu Kadu sarkarnama
विदर्भ

Bachchu Kadu News :...तर गेम करू, भाजपच्या भूमिकेवर बच्चू कडू कडाडले

Roshan More

Political News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यात महायुतीच्या पक्षांची एकत्रित बैठक होत आहे. मात्र, महायुतीचा घटक असून देखील बच्चू कडू या बैठकीला गेले नाहीत. अमरावतीच्या जागेवरून अजून निर्णय झालेला नाही. नवनीत राणा या जागेवरून भाजपच्या टिकीटावरून लढणार असल्याची चर्चा आहे. मात्र, बच्चू कडू यांचा राणा यांना विरोध आहे.

भाजपसाठी लोकसभा जेवढी महत्त्वाची तेवढीच आमच्यासाठी विधानसभा. त्यानी लोकसभेचा विचार करावा आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे लोकसभेसोबत विधानसभेचे चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमची भूमिका तटस्थ राहणार आहे. आम्ही तटस्थ आहोत म्हणजे वाट पाहू, बैठका करू यातून काही निर्णय झाला नाही तर गेम करू, असे थेट इशाराच बच्चू कडू (Bachu Kadu ) यांनी भाजपला दिला आहे.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपला महायुतीतील मित्र पक्षांची गरज राहणार नाही, अशी टीका महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे महायुतील छोटे पक्ष विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा देखील आत्ताच करा अशी भूमिका घेत आहेत. विधानसभेच्या निवडणुकी विषयी भाजप आपली भूमिका स्पष्ट करावी. विधानसभेचे चित्र देखील आत्ताच स्पष्ट व्हावे, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बैठकीला जाणार नाही

आज (रविवारी) महायुतीची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीला आपण जाणार नसल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. प्रहार जनशक्तीकडे दोन नगरपंचायती आहेत. ग्रामपंयाती आहेत. मात्र त्याला निधी मिळत नाही. निधी मिळत नसल्याने आपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे आम्ही तटस्थ राहणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली. आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहोत. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे देखील कडू यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT