Amravati Politics : अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा प्रहार जनशक्ती पार्टीच्या तिकिटावर लोकसभेची आगामी निवडणूक लढावी, असा प्रस्ताव आमदार अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. आमदार कडू यांनी दिलेल्या या प्रस्तावावर खासदार राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांचे यासाठी आभार मानले आहेत. महायुतीचा धर्म आमदार बच्चू कडू हे पाळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अमरावती येथे बोलताना रवी राणा म्हणाले की, ‘आमदार बच्चू कडू हे महायुतीचा धर्म पाळत आहेत. ते लोकसभा निवडणुकीसाठी नवनीत राणा यांना पाठिंबा देणार आहेत.'
आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेता मानतो. त्यामुळे नवनीत राणा यांच्याबाबत ते निर्णय घेतील. बच्चू कडू यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला असेल तर आपणही त्यांना अचलपूर मतदारसंघात मदत करू. लोकसभा निवडणुकीत कडू यांनी नवनीत राणा यांना मदत केली तर युवा स्वाभिमान पार्टीही आमदार बच्चू कडू यांना लोकसभा निवडणुकीत मदत करेल. मात्र लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी काही राजकारण केल्यास किंवा वाकडी चाल खेळल्यास त्यांना सरळ करण्याचे कामही करू, असा इशाराही राणा यांनी दिला आहे.
देशात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रातही भाजपची जबरदस्त ताकद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत महायुतीमध्ये आहेत. आमदार बच्चू कडू हे अपक्ष असले तरी ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून महायुतीत आहेत. त्यामुळे महायुतीमधील सर्वांसाठीच मैत्रीचा धर्म पाळणे गरजेचे आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार रामदास आठवले यांनीही खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला आहे, त्यांचेही राणा यांनी आभार मानले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमरावती लोकसभेची जागा प्रहार जनशक्ती पार्टीला हवी आहे. पाहिजे तर खासदार नवनीत राणा यांना प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा मतदार संघातून लढवू असे बच्चू कडू म्हणाले होते. अकोला, अमरावतीसह लोकसभेच्या तीन जागांवर बच्चू कडू यांनी दावा केला आहे. महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद होत असताना आमदार कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रात होणार आहे. विधानसभेच्या 15 जागा प्रहार जनशक्ती पार्टीला लढवायच्या आहेत, असेही ते म्हणाले. यासंदर्भात 15 जानेवारीनंतर बैठक घेऊन त्यात भूमिका स्पष्ट करू, असेही कडू यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.