Bacchu Kadu with family Sarkarnama
विदर्भ

Bachu Kadu's 'strike' : बच्चू कडूंचा पुन्हा ‘प्रहार’; म्हणाले, जे सरकारने दिलं नाही, तितकं बैलांनी दिलं !

Maharashtra : बच्चू कडूंचं विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

Atul Mehere

Amravati Political News : पोळ्याच्या सणानिमित्ताने राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनीही वृषभराजांचे पूजन केले. महाराष्ट्रीयन पद्धतीनं बैलजोड्यांची पूजा करण्यात आली. अशात प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केलेलं विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील बेलोरा आपल्या मूळ गावी पोळ्यानिमित्त बैलजोडीची विधिवत पूजा केली. (Bachu Kadu's statement is currently becoming a topic of discussion in political circles)

यावेळी बोलताना आमदार कडू यांनी शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करण्यात सरकारही कमी पडल्याचं विधान केलं. सध्या उद्योगपतींचा बोलबाला आहे. शेतकऱ्यांकडे आता काहीच राहिलेले नाही. त्यामुळे एकेकाळी नफ्यात राहणारी शेती आता तोट्यात गेली आहे. शेतकऱ्यांची लूट कमी झाली पाहिजे, अशी अपेक्षा आमदार कडू यांनी व्यक्त केली. शेतीसाठी लागणारे बियाणे, ट्रॅक्टर, शेतमालाचे भाव हे सारं उद्योगपतींच्याच हातात आहे. त्यामुळे खंत वाटते, असे ते म्हणाले.

पूर्वीच्या काळी अर्थव्यवस्थेसह अनेक बाबींचे केंद्र ग्रामीण भागातील खेडी होती. आता तसे चित्र राहिलेले नाही. आपण आजही वृषभराजांची पूजा करतोय. आजपर्यंतच्या सरकारांनी जितकं दिलं नाही, तितकं या वृषभराजांनी शेतकऱ्यांना (Farmers) भरभरून दिलं आहे, असेही आमदार कडू (Bacchu Kadu) म्हणाले. पोळ्याच्या निमित्ताने बच्चू कडू यांच्या मूळ गाव बेलोरा येथे बेंदूर उत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सवात आमदार कडू यांनी आपल्या परिवारासह सहभाग घेतला. गावातील ग्रामस्थांसह आमदार कडू यांनी यानिमित्ताने बराच वेळ घालविला. शेतकरी व शेतमजुरांशी संवाद साधला. देशात व राज्यात असलेल्या सध्याच्या राजकीय (Political) स्थितीवर गावातील पारावर गप्पाही यावेळी रंगल्या.

गेल्या ७० वर्षांत खेड्यांतील अनेक गोष्टींवर, संस्कृतीवर, चालीरीतींवर शहरी दरोडाच पडल्याचे मत आमदार कडू यांनी यावेळी व्यक्त केले. शेतांमध्येही आता यंत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे आधीसारख्या बैलजोड्या, गोवंशही गावांमध्ये दिसत नाही, असे ते म्हणाले. पूर्वीच्या काळी पशुधन गावांची शान होती. परंतु जसजसे शेतीत नुकसान होऊ लागले, तसतसे पशुधनाची संख्याही रोडावली. सध्या गावांमध्ये अस्तित्वात असलेले पशुधनही संकटात आहे, याबद्दल आमदार कडू यांनी दु:ख व्यक्त केले.

अनेक नेत्यांकडून पूजन..

अमरावती जिल्ह्यात पोळ्यानिमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये वृषभपूजन केले. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या गावांमध्ये आयोजित पोळा उत्सवादरम्यान विधिवत पूजन केले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT